विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कर्पुरी ठाकूर, लालकृष्ण अडवाणी यांच्या पाठोपाठ दिवंगत माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव आणि चौधरी चरण सिंह यांना भारतरत्न किताब जाहीर करून मोदी सरकारने गांधी परिवारावर मास्टर स्ट्रोक मारला आहे. Bharat Ratna announced to Narasimha Rao, Charan Singh, Swaminathan
आत्तापर्यंत गांधी परिवारातल्या सर्व पंतप्रधानांना एकापाठोपाठ एक भारतरत्न किताब घेणाऱ्या काँग्रेस सरकारांना ही मोठी चपराक मानली जात आहे. मोदी सरकारने पद्म पुरस्कारांचे लोकशाहीकरण करून अनेक अज्ञात योगदानकर्त्यांना पद्मश्री पासून पद्मभूषण पर्यंत विविध पद्म पुरस्कार जाहीर केले आणि प्रत्यक्षात प्रदान केले. त्या पाठोपाठ भारतरत्न या किताबाचे देखील लोकशाहीकरण करून तो सर्वपक्षीय योगदानकर्त्यांना जाहीर करून प्रदान केला. याआधी मोदी सरकारने माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना देखील त्यांची राजकीय प्रणाली काँग्रेसची असून देखील भारतरत्न किताब प्रदान केला आहे.
पण त्यांच्या आधीच म्हणजे 2021 मध्येच नरसिंह राव यांची जन्मशताब्दी असताना त्यांना भारतरत्न किताब जाहीर करायला हवा होता. तो मोदी सरकारने 2024 मध्ये जाहीर केला आहे. त्यांच्याबरोबरच माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांना देखील मोदी सरकारने भारतरत्न किताब जाहीर करून त्यांच्या शेतकरी हिताच्या कार्यक्रमाला वंदन केले आहे.
चौधरी चरण सिंह यांच्याबरोबरच प्रख्यात कृषी शास्त्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना देखील भारतरत्न किताब जाहीर केला आहे. शेती किफायतशीर व्हावी. शेतकऱ्यांच्या हाती उद्योगासारखा पैसा असायला हवा. यासाठी कृषिमूल्य आयोगाचे मोठे योगदान देणाऱ्या स्वामीनाथन यांना भारतरत्न किताब जाहीर झाल्याने शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App