सुनील गावस्कर म्हणतात…मी आणि सचिनपेक्षाही हा मोठा भारतीय आयकॉन


सुनील गावस्कर हे सत्तरच्या दशकातील निर्विवादपणे सर्वात मोठे भारतीय क्रिकेट स्टार होते. सन 1983 चा क्रिकेट वर्ल्ड कप जिंकून देणारा कर्णधार कपील देव त्यानंतर मोठा स्टार झाला. त्यानंतरची अडीच दशके मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर भारतीयांच्या गळ्यातील ताईत होता. मात्र लिटर मास्टर सुनील गावस्कर यांच्यामते ते स्वतः किंवा सचिन या दोघांपेक्षाही हा भारतीय सर्वात मोठा आयकॉन आहे. Former Indian skipper Sunil Gavaskar has named the bigger icon of India even from him and ‘Master Blaster’ Sachin Tendulkar.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : भारताचा माजी कर्णधार आणि स्पष्टवक्ता असलेल्या सुनील गावस्कर यांनी त्यांच्यापेक्षा आणि ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकर याच्याही पेक्षा मोठा इंडियन आयकॉन कोण याचे उत्तर दिले आहे. अ‍ॅनालिस्ट इनसाइडतर्फे आयोजित पॉडकास्टवर ते बोलत होते.

क्रिकेट आणि बॉलिवूड हे भारतात सर्वाधिक लोकप्रिय असते. या दोन्ही क्षेत्रात तीव्र स्पर्धाही आहे. या पार्श्वभूमीवर भारतातला सर्वात मोठा आयकॉन कोण या प्रश्नावर गावस्कर यांनी बॉलिवूडमधील स्टार ऑफ द मिलेनियम म्हणून गौरवल्या जाणाऱ्या अमिताभ बच्चन यांचे नाव घेतले.



गावस्कर म्हणाले की, अमिताभ हे महान आहेत. ते अविश्वसनीय आहेत. अमिताभ बच्चन हे तुमच्यापेक्षा आणि सचिन तेंडुलकरांपेक्षा मोठे आयकॉन आहेत का, असे विचारल्यावरही गावस्कर म्हणाले, “तो आमच्या दोघांच्याहीपेक्षा ते मोठे आहेत.

एवढेच नव्हे तर ते सर्वात मोठे आहेत.” गावस्कर पुढे म्हणतात “अमिताभ खरोखरच मोठा आणि विलक्षण आहे. त्यांचा अभिनय कमालीचा नैसर्गिक आहे. इतर कलाकार एखादी भूमिका निभावतात तेव्हा आपल्याला माहिती असतं की हा अमुक कलाकार आहे.

पण अमिताभ बच्चन जेव्हा एखादी भूमिका साकारतात तेव्हा आपल्याला अमिताभ बच्चन आठवत नाहीत तर त्यांचे पडद्यावरचे रुपच आपल्या लक्षात ठेवतात. ते साकारत असणारी भूमिका ते जिवंत करतात. अर्थात हे माझे मत आहे.”

या क्रिकेटसंबंधी प्रश्नादरम्यान सुनील गावस्कर म्हणाले की, मला एबी डिव्हिलीयर्स सारखी फलंदाजी करायला आवडेल. मैदानाच्या सगळ्या कोपऱ्यांमध्ये फटके मारण्याची एबीडीची क्षमता अचाट आहे. पण तो ते सहजतेने खेळत असल्याचे भासवतो.

क्रिकेटच्या आजवरच्या इतिहासातला एबीडी हा एक सर्वोत्तम फलंदाज आहे. त्याची फलंदाजी खूप सहजसुंदर आहे. क्रिकेटचे फटके पुस्तकी तंत्रशुद्धतेनुसार मारण्यासोबतच मैदानात कुठेही चेंडू भिरकावून देण्याचे एबीडीचे कौशल्य अफलातून आहे. त्यामुळेच दक्षिण आफ्रिकेचा हा फलंदाज मला आवडतो, असे गावस्कर यांनी स्पष्ट केले.

“एबी डिव्हिलियर्स सारखी फलंदाजी केली पाहिजे. म्हणजे 360 अंशातली फटकेबाजी. सगळ्या प्रकारचे फटके मारा. म्हणजे जणू तो नेटमध्ये खेळतोय इतक्या सहजतेने खेळतो. त्याची फलंदाजी तो खूप सोपी असल्याचे भासवतो. दूरवर चेंडू टोलवण्यात तो माहीर आहे.

त्याचबरोबर त्याच्या फलंदाजीत सहजताही आहे. त्याचे काही फटके पाहतो तेव्हा मला त्याच्या बॅटचा फॉलो-थ्रू पाहणे खूप आवडते. बरोबर खांद्याच्यावर त्याची बॅट गेलेली असते.

त्याचे फटके म्हणजे केवळ हाणामारी नसते, तर ते तंत्रशुद्ध फटके असतात. त्याला खेळताना पाहणे मला खूप आवडते,” अशी स्तुतीसुमने गावस्कर यांनी उधळली.

Former Indian skipper Sunil Gavaskar has named the bigger icon of India even from him and ‘Master Blaster’ Sachin Tendulkar.

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात