कोरोनापासून बचावासाठी गोमूत्र प्या ; भाजप आमदाराकडून व्हिडीओ शेअर


वृत्तसंस्था

लखनौ : देशभरात कोरोनाने हाहाकार उडविला आहे. त्याच्यावर कशी मात करायची ? असा प्रश्न भेडसावत आहे. आता उत्तर प्रदेशच्या बलियाच्या बैरिया विधानसभेचे भाजप आमदार सुरेंद्र सिंह यांनी कोरोनापासून बचाव करण्यासाठी गोमूत्र पिण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी गोमूत्र पितानाचा स्वतःचा व्हिडिओदेखील शेअर केला आहे. Drink Cow Urine dilya and protect Your Self From coronavirus : Bjp Aamdar surendra Singh Advice to People

अनेक ठिकाणी औषधांचा आणि आवश्यक इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. अशात स्वदेशी चिकित्सा पद्धतीकडे नागरिक वळू लागले आहेत.


India Corona Cases Updates : देशात सलग दुसऱ्या दिवशी ४ लाखांहून अधिक रुग्णांची नोंद, मागच्या १० दिवसांत दर तासाला १५० मृत्यू


आमदार सुरेंद्र सिंह यांनी शुक्रवारी एक व्हिडिओ शेअर केला. त्या माध्यमातून ते लोकांना गोमूत्र पिण्याचा सल्ला देत आहेत. मी रोज गोमूत्र पितो. त्यामुळेच निरोगी आहे. सकाळी ब्रश केल्यानंतर काहीही न खाता ठंड पाण्यात 5 झाकण गोमूत्र मिसळून प्यावं आणि यानंतर अर्धा तास काहीच खाऊ नये.

असं केल्यास कोरोनासह कोणताच आजार तुम्हाला होणार नाही, वैद्यकीय उपचारांपेक्षाही हा पर्याय उत्तम असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सुरेंद्र सिंह यांच्या म्हणण्यानुसार, कोरोनाच्या काळात विज्ञानही फेल ठरलं आहे. अशात या गोमूत्रानं त्यांना अजूनही सुरक्षित ठेवलं आहे.

Drink Cow Urine dilya and protect Your Self From coronavirus : Bjp Aamdar surendra Singh Advice to People

महत्वाच्या  बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात