लहान मुलांना धोक्याचे पुरावे नाहीत, लोकांना घाबरण्याची काहीच कारण नाही


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली – कोरोनाच्या संसर्गाची तिसरी लाट ही लहान मुलांसाठी घातक ठरू शकेल, हे दर्शविणारे कोणतेही ठोस संकेत आतापर्यंत मिळालेले नाहीत.’’ असे केंद्र सरकारने स्पष्ट केले. Don’t get panic due to Third wave

‘एम्स’चे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितले, की ‘‘दुसऱ्या लाटेमध्ये बालकांना आणि मुलांना संसर्ग होण्याचे प्रमाण आपल्या देशात तुलनेने फार कमी राहिले आहे त्यामुळे तिसऱ्या लाटेचा गंभीर परिणाम होऊ शकतो, या दाव्यात वैद्यकीयदृष्ट्या अद्यापतरी कोणतेही तथ्य आढळून आलेले नाही.



संसर्गाची तिसरी लाट लहान मुलांसाठी हानिकारक ठरेल, या दाव्यांमध्ये बालरोगतज्ञांच्या संघटनांनाही कोणतेही तथ्य आढळलेले नाही त्यामुळे लोकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. देशाजवळ दोन लाटांचा सामना करण्याचा अनुभव आहे.

त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट येणारच असे ठामपणे मानून चालणार नाही. त्याचबरोबर संभाव्य संसर्गाला तोंड देण्यासाठी सर्व यंत्रणा तसेच उपाययोजनांमध्येही कोणत्याही प्रकारची शिथिलता येणे परवडणारे नाही.’’ असेही गुलेरियांनी स्पष्ट केले.

Don’t get panic due to Third wave

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात