ऑस्ट्रेलियातील संशोधकांची बनविली कोरोनावर दोन औषधे, रुग्णांना मिळणार दिलासा


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियातील वैज्ञानिकांनी कोरोनावर दोन औषधे विकसित केली आहेत. यातील पहिले औषध कोरोनापासून संरक्षण करते. त्याचप्रमाणे, दुसरे औषध कोरोना झालेल्यांना दिल्यास गंभीर संसर्गापासून त्यांचे रक्षण होऊ शकते, असा वैज्ञानिकांचा दावा आहे.
ही औषधे कोरोना विषाणूला लक्ष्य करत नाहीत. त्याऐवजी ती पेशी विषाणूला कसा प्रतिसाद देतात, त्यावर लक्ष्य केंद्रित करतात. यातील पहिले औषध कोरोना होऊ नये म्हणून घ्यायचे आहे. ते कोरोना प्रतिबंधक लशीची क्षमता वाढविते. त्याचप्रमाणे, दुसरे औषध कोरोना झाल्यानंतर विषाणुचा पेशींमधील संसर्ग वाढण्यापासून रोखते. scientist made two medicines on corona



या औषधांचे थोडेसे दुष्परिणाम असले तरी ती विषारी नसल्याचे स्पष्टीकरणही संशोधकांनी दिले. ही औषधे सामान्य तापमानाला ठेवता येऊ शकतात. त्यामुळे, त्यांचे व्यवस्थित वितरण होण्याचा विश्वासही संशोधकांना आहे. कोरोना विषाणूची शरीरात प्रवेश करण्याचा पूर्वी माहित नसलेले पद्धत लक्षात आल्यानंतर ही औषधे विकसित करता आली. यातील पहिले औषध मानवी पेशींवरील एसीई२ प्रथिनांचे टोक बंद करून कोरोनापासून रक्षण करते. कोरोना विषाणू या प्रथिनांच्या टोकाच्या मदतीने पेशींवर आक्रमण करतो. विषाणूने यानंतरही पेशींमध्ये आपला मार्ग शोधला तरी दुसरे औषध विषाणूला पेशींवर ताबा मिळवून स्वत:च्या प्रतिकृती तयार करण्यापासून रोखते.

scientist made two medicines on corona

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात