केंद्राच्या निर्णयामुळे भिकारी, कैदी, साधूंनाही लाभ, ओळखपत्र नसणाऱ्यांचेही आता होणार लसीकरण


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली – ऑनलाइन नाव नोंदणीसाठी आवश्यक असलेली ओळखपत्रेच ज्यांच्याकडे नाहीत अशा विविध धर्मांमधील साधू महंत व फकीर तसेच कैदी, भिकारी आदी कोट्यवधी नागरिकांसाठी केंद्र सरकारने नवे निर्देश जारी केले आहेत. त्यानुसार संबंधित जिल्हाधिकाऱ्यांवर किंवा जिल्हा लसीकरण अधिकाऱ्याकडे अशा वर्गाच्या लसीकरणाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. without Id proof some people get vaccine

१८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणालाही नुकतीच सुरुवात झाली. मात्र यासाठी कोविन पोर्टल किंवा ॲपवर नावनोंदणी बंधनकारक आहे. हे रजिस्ट्रेशन करताना नागरिकांना ओळख म्हणून आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड आदीपैकी एक ओळखीचा पुरावा अपलोड करावा लागतो. हरिद्वार येथील कुंभमेळ्यानंतर कोरोनाचा जो महा उद्रेक झाला त्यानंतर ओळखपत्र नसलेल्या वर्गासाठीही लसीकरण कसे? उपलब्ध करून देता येईल याबाबत चर्चा सुरू झाली.



राज्य पातळीवर त्यांची संख्या निश्चित करून अशा नागरिकांना लसीकरण करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे असेल, असेही आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

देशात सध्या रोज सरासरी १६ लाख लोकांचे लसीकरण केले जात आहे. मात्र केंद्राने ठरविलेले लक्ष्य पूर्ण करण्यासाठी डिसेंबरपर्यंत ही संख्या किमान ३४ लाखांपर्यंत तरी वाढवावी लागेल. त्यादृष्टीने देशभरातील लस टंचाई संपविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

without Id proof some people get vaccine

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात