वृत्तसंस्था
नवी दिल्ली : खालिस्तानी दहशतवादी अवतार सिंह खंडा याचा मृत्यू झाला लंडनमध्ये याच अवतार सिंह खंडाने भारतीय उच्च आयुक्तालयाच्या इमारतीवरून भारतीय ध्वज उतविण्याचा देशद्रोह केला होता. काहींच्या मते खंडा कर्करोगाने गेला आहे, तर काहींच्या मते त्याला विष दिले गेले आहे. Death of Khalistani terrorist Avtar Singh Khanda
अवतार सिंह खंडा हा bomb expert होता आणि याच अवतारने अमृतपाल सिंह याला लपून राहण्यास मदत केली होती. लंडन मधल्या भारतीय उच्चायुक्तालयाच्या वर हल्ला करण्यासाठी देखील यानेच चिथावणी दिली होती. खालिस्तानशी संबंधित अनेक दहशतवादी कारवायांशी याचा संबंध होता.
ब्रिटनमध्ये भारतीय तिरंग्याचा अपमान : खलिस्तान समर्थकांनी भारतीय उच्चायुक्तालयातून खाली उतरवला तिरंगा, तोडफोड केली, अमृतपाल सिंगचे पोस्टर झळकावले
काही भारतीय आणि पाश्चात्य माध्यमांमध्ये अवतार सिंह खांडा याला फक्त खालिस्तानी समर्थक कार्यकर्ता असे संबोधले आहे. तो दहशतवादी असताना देखील त्याच्याविषयी लिबरल मीडियाने सॉफ्ट कॉर्नर दाखवत Terrorist या शब्दाऐवजी Militant शब्दाचा वापर केला आहे. त्यातही अनेकांनी बातमी आणखी सौम्य करून त्याला फक्त Pro-Khalistan Activist एवढेच लिहिले आहे.
खालिस्तानी संघटनांनी तसेच खालिस्तानशी सहानुभूती ठेवणाऱ्या लिबरल्सनी अवतार सिंह खंडा यांच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App