Coronavirus Death in UP: कोरोनाने उत्तर प्रदेशात टिपला भाजपच्या चवथ्या आमदाराचा बळी


वृत्तसंस्था

रायबरेली : उत्तरप्रदेशातील रायबरेतील सलोन विधानसभा मतदार संघातील भाजपचे आमदार दल बहादुर कोरी यांचे शुक्रवारी (ता. 7 ) कोरोनामुळे निधन झाले आहे. राज्यात कोरोनामुळे निधन पावलेले ते भाजपचे चौथे आमदार आहेत. Coronavirus Death in UP bjp mla dal bahadur

गेल्या काही दिवसांपासून आमदार दल बहादुर कोरी हे कोरोना विषाणूपासून संक्रमित झाले होते. राज्यात नुकत्याच झालेल्या पंचायतीच्या निवडणूक प्रचारात त्यांनी हिरीरीने भाग घेतला होता. त्यांचे शुक्रवारी निधन झाले. Coronavirus Death in UP


Maharashtra Corona Updates : २४ तासांत राज्यात ९०० पेक्षा जास्त कोरोना रुग्णांचा मृत्यू, रुग्णसंख्याही पुन्हा वाढली


राज्यात कोरोनामुळे हाहाकार उडाला आहे. गेल्या काही दिवसात कोरोनाने सत्ताधारी पक्षातील आमदारांना लक्ष्य केले आहे. गेल्या 15 दिवसांत भाजपचे चार आमदार कोरोनाने बळी गेले आहेत.
दल बहादुर कोरी यांच्या पूर्वी लखनौ पश्चिमचे भाजपचे आमदार सुरेश कुमार श्रीवास्तव, औरैया सदरचे आमदार रमेश चंद्र दिवाकर आणि बरेलीचे नवाबगंजचे केसर सिंह गंगवार यांचा कोरोनाने मृत्यू झाला होता.

भाजपपासून राजकीय कारकीर्द सुरु करणारे दल बहादुर कोरी यांनी बसपा, काँग्रेस आणि पुन्हा भाजप असा राजकीय प्रवास केला. 2019 मध्ये भाजपवासी झाल्यानंतर त्यांनी रायबरेलीच्या खासदार स्मृती इराणी यांच्या विजयात मोठा हातभार लावला.तयामुळे इराणी यांचे निकटवर्ती मानले जात होते. 64 वर्षीय कोरी यांना कोरोना झाल्यावर 19 एप्रिलला लखनौ येथील रुग्णालयातून कोरोनामुक्त झाले होते. पण, पुन्हा प्रकृती बिघडल्याने त्यांना स्मृती इराणी यांच्या मदतीने अपोलो रुग्णालयात दाखल केले होते. सात दिवस ते व्हेंटिलेटरवर ठेवले होते. शुक्रवारी त्यांची प्राणज्योत मालवली.

Coronavirus Death in UP bjp mla dal bahadur

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात