Corona Cases In India : २४ तासांत २.५७ लाख नवीन रुग्णांची नोंद, सक्रिय रुग्णसंख्या एक लाखाने घटली

Corona Cases In India Today 2.57 lakh New cases Found In 24 Hours See Updates

Corona Cases In India : देशातील कोरोना महामारीची दुसरी लाट आता ओसरू लागली आहे. काही दिवसांपूर्वी जिथे दररोज चार लाख रुग्ण आढळत होते, तेथे आता दररोज अडीच लाख नवीन रुग्ण आढळत आहे. तथापि, मृत्यूंची संख्या मात्र चार हजारांपेक्षा जास्तच आहे. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांमध्ये 2,57,299 नवीन कोरोना रुग्ण समोर आले आहेत आणि 4194 बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी कोरोनातून 3,57,630 जण बरेही झाले आहेत. म्हणजेच 1 लाख 4 हजार 525 सक्रिय रुग्ण कमी झाले आहेत. यापूर्वी गुरुवारी 2.59 लाख नवीन रुग्णांची नोंद झाली होती. तर 4209 बाधितांचा मृत्यू झाला होता. Corona Cases In India Today 2.57 lakh New cases Found In 24 Hours See Updates


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशातील कोरोना महामारीची दुसरी लाट आता ओसरू लागली आहे. काही दिवसांपूर्वी जिथे दररोज चार लाख रुग्ण आढळत होते, तेथे आता दररोज अडीच लाख नवीन रुग्ण आढळत आहे. तथापि, मृत्यूंची संख्या मात्र चार हजारांपेक्षा जास्तच आहे. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांमध्ये 2,57,299 नवीन कोरोना रुग्ण समोर आले आहेत आणि 4194 बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी कोरोनातून 3,57,630 जण बरेही झाले आहेत. म्हणजेच 1 लाख 4 हजार 525 सक्रिय रुग्ण कमी झाले आहेत. यापूर्वी गुरुवारी 2.59 लाख नवीन रुग्णांची नोंद झाली होती. तर 4209 बाधितांचा मृत्यू झाला होता.

21 मेपर्यंत देशभरात 19 कोटी 33 लाख 72 हजार 819 कोरोनावरील लसीचे डोस देण्यात आले आहेत. काल 14 लाख 58 हजार 895 डोस देण्यात आले. त्याचबरोबर 32 कोटी 64 लाखांहून अधिक कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. काल तब्बल 20.66 लाख कोरोना चाचण्या घेण्यात आल्या, यातील पॉझिटिव्हिटी रेट 12 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

कोरोनाची देशातील सद्य:स्थिती

एकूण कोरोना रुग्ण – 2 कोटी 62 लाख 89 हजार 290
एकूण बरे झालेले रुग्ण – 2 कोटी 30 लाख 70 हजार 365 रुपये
एकूण सक्रिय रुग्णसंख्या – 29 लाख 23 हजार 400
देशभरातील एकूण मृत्यू – 2 लाख 95 हजार 525

देशातील कोरोनाचा मृत्यू दर 1.12 टक्के आहे, तर बरे होण्याचा दर 87 टक्क्यांहून अधिक आहे. सक्रिय रुग्ण 12 टक्क्यांपेक्षा कमी झाले आहेत. कोरोना सक्रिय रुग्णांच्या बाबतीत भारत जगात दुसर्‍या क्रमांकावर आहे. संसर्ग झालेल्या एकूण लोकांच्या बाबतीतही भारत दुसर्‍या क्रमांकावर आहे. तर अमेरिका आणि ब्राझीलनंतर जगात सर्वाधिक मृत्यू भारतात आहेत.

महाराष्ट्रात 30 हजारांहून कमी नव्या रुग्णांची नोंद

महाराष्ट्रात सलग सातव्या दिवशी 35 हजारांहूनही कमी कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे आणि दुसर्‍या दिवशी 30 हजारांपेक्षा कमी नवीन कोरोनांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 29,644 नवीन रुग्ण आढळले, तर 555 मृत्यू झाले आहेत. यादरम्यान 44,493 जण बरेही झाले आहेत. महाराष्ट्रातील एकूण रुग्णांचा आकडा 55 लाख 27 हजार 92 पर्यंत गेला आहे. त्यापैकी एकूण 50 लाख 70 हजार 801 रुग्ण बरे झाले आहेत. यामध्ये 86,618 बाधितांना आपला जीव गमवावा लागला आहे. 3 लाख 67 हजार 121 जण अद्यापही बाधित आहेत.

Corona Cases In India Today 2.57 lakh New cases Found In 24 Hours See Updates

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात