2024च्या लोकसभा निवडणुकीत कर्नाटकात काँग्रेस 71 टक्के जागा जिंकेल, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा दावा


वृत्तसंस्था

बंगळुरू : 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष राज्यात किमान 20 जागा जिंकेल, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे. कर्नाटकात लोकसभेच्या एकूण 28 जागा आहेत. राज्यात काँग्रेसची सत्ता आहे. सिद्धरामय्या यांनी जास्त जागा जिंकण्याचा भाजपचा दावा फेटाळून लावला.Congress will win 71 percent seats in Karnataka in 2024 Lok Sabha elections, claims Chief Minister Siddaramaiah

मंड्यामध्ये सिद्धरामय्या म्हणाले, “यावेळी आम्ही किमान 20 जागा जिंकण्याची तयारी करत आहोत. भारतीय जनता पक्ष 28 जागा जिंकण्याचा पोकळ दावा करत आहे. त्यांना कळून चुकले आहे की, यावेळी कर्नाटकची जनता काँग्रेसला आशीर्वाद देईल.”



जेडीएस वेगळ्या पक्षाप्रमाणे काम करत नाही – मुख्यमंत्री सिद्धरामय्या

भारतीय जनता पक्ष आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) यांच्या युतीविरोधातील रणनीतीबाबत मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, “यावेळी आमच्याकडे एकच विरोधी पक्ष आहे भाजप. विरोधी पक्षात दोन नाही, तर एकच पक्ष आहे. जनता दलाचे (धर्मनिरपेक्ष) भाजपमध्ये विलीनीकरण झाले आहे आणि तो आता वेगळा पक्ष म्हणून काम करत नाही.”

गेल्या निवडणुकीत भाजपला 25 जागा मिळाल्या

2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने कर्नाटकात 25 जागा जिंकल्या. तर मंड्या मतदारसंघातून अपक्ष उमेदवार सुमलता विजयी झाल्या होत्या. या उमेदवाराला भाजपचाही पाठिंबा मिळाला. काँग्रेस आणि जेडीएस या दोन्ही पक्षांना प्रत्येकी एक जागा मिळाली. मात्र, त्यानंतर विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली.

राज्य सरकारच्या मंत्र्यांना लोकसभेचे तिकीट देण्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, पक्षाचे हायकमांड ज्या आमदार किंवा मंत्र्याला तिकीट देतील त्याला निवडणुकीत उतरवले जाईल. अर्थसंकल्पाशी संबंधित प्रश्नावर ते म्हणाले की, गरीब विरोधी लोकांना हा अर्थसंकल्प समजू शकत नाही.

Congress will win 71 percent seats in Karnataka in 2024 Lok Sabha elections, claims Chief Minister Siddaramaiah

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात