मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, राम नाईक, पवारांकडून लालकृष्ण अडवाणींचे अभिनंदन; मुख्यमंत्र्यांना आठवली बाळासाहेब – आडवाणींची अनोखी मैत्री!!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : माजी उपपंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना मोदी सरकारने भारतरत्न किताब जाहीर केला आणि त्यांच्यावर जगभरातून आनंद अभिनंदनचा वर्षाव झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लालकृष्ण अडवाणींचे अभिनंदन केले आहे. Congratulations to LK Advani from Ram Naik, Pawar

अडवाणींचे अभिनंदन करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांची बाळासाहेब ठाकरे यांची मैत्री आठवली.

मीडिया अकाउंट वर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोस्ट लिहून अडवाणींचे अभिनंदन केले.

ते असे :

सर्वसामान्य नागरिकांचे कल्याण, विकासाचा ध्यास आणि प्रखर हिंदुत्वाचा विचार अंगिकारत राजकीय, सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे पितृतुल्य व्यक्तिमत्त्व लालकृष्ण आडवाणीजी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर होणे ही अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. अयोध्येत श्रीरामाचे भव्य मंदिर उभे राहावे या विचाराने रथयात्रा काढून आडवाणीजींनी जनजागृती केली. अयोध्येत राम मंदिराची उभारणी झाल्यावर आडवाणीजींच्या योगदानाचे स्मरण ठेवून प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी हा पुरस्कार जाहीर केला, हे आपल्या भारतीय संस्काराचे द्योतक म्हणावे लागेल. आणीबाणी आणि त्यानंतर ढवळून निघालेल्या राजकीय पटलावर जनसंघ आणि भाजपच्या माध्यमातून देशहिताचा विचार मांडत राहून त्यांनी विरोधी पक्षाची भूमिका कायम चोख निभावली. उपपंतप्रधान म्हणून त्यांचे योगदान कायम स्मरणात राहणार आहे. राजकारणातील तरुण पिढीसाठी मार्गदर्शकाची भूमिका निभावणाऱ्या आडवाणीजी आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची मैत्रीही अनोखी होती. हिंदुत्वाचा विचार आणि श्रीरामाचा ध्यास असलेली ही दोन व्यक्तिमत्वे सकारात्मक राजकीय साथीदार होते. भारतरत्न सन्मान जाहीर झाल्याबद्दल या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाचे मी अभिनंदन करतो आणि त्यांना प्रणाम.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर आडवाणींचे अभिनंदन केले.

ते असे :

भारताचे माजी उपपंतप्रधान आणि आमचे ज्येष्ठ नेते, मार्गदर्शक लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर होणे, या एका कणखर व्यक्तिमत्त्वाचा यथार्थ सन्मान आहे, असे सांगत या निर्णयाबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला आहे आणि लालकृष्ण अडवाणींचे अभिनंदन केले आहे.

लालकृष्ण अडवाणी यांनी ‘लोहपुरुष’ या नात्याने एक कणखर गृहमंत्री म्हणून देशाची सेवा केली. विशेषत: श्रीरामजन्मभूमीच्या आंदोलनात त्यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका राहिली. सुमारे 6 दशके त्यांनी राजकारणात घालविली. एक निष्कलंक व्यक्तिमत्त्व तर ते आहेतच, शिवाय राष्ट्रसेवेत त्यांची मोठी भूमिका राहिली आहे. राजकारणात अशाप्रकारचे चारित्र्य त्यांनी सांभाळले आणि विविध विषयांचा त्यांचा सातत्याने व्यासंग राहिला. त्यांना भारतरत्न ही उपाधी जाहीर झाल्याबद्दल मला व्यक्तिगत आनंद झाला आहे, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

शरद पवारांनी अडवाणींच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाची प्रशंसा केली त्यांची आणि आमची विचारसरणी जुळत नसली तरी त्यांचे निष्कलंक जीवन देशवासीयांसाठी मार्गदर्शक राहिले असे शरद पवार म्हणाले तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अडवाणींना भारतरत्न देऊन संपूर्ण देशाची कृतज्ञता व्यक्त केल्याचे मत राम नाईक यांनी व्यक्त केले.

Congratulations to LK Advani from Ram Naik, Pawar

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात