जुनी वाहने भंगारात काढण्यासाठी आज खल, व्हेईकल स्क्रॅपिंग पॉलिसीवर गुजरातमध्ये परिषद; पंतप्रधान मोदी करणार मार्गदर्शन


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : जुनी वाहने भांगारात (व्हेईकल स्क्रॅपिंग पॉलिसीवर ) काढण्याच्या धोरणावर चर्चा करण्यासाठी गुजरातमध्ये परिषद आयोजित केली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यामध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार आहेत. Conference in Gujarat on Vehicle Scrapping Policy; Prime Minister Modi will guide

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या पुढाकाराने ही परिषद होत आहे. परिषदेत गुंतवणूकदार, उद्योगपती, उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ, केंद्र आणि राज्य सरकारच्या संबंधित मंत्रालयाचे अधिकारी सहभागी होणार आहेत.



रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने गेल्या वर्षी २६ जुलै लरोजी मोटार वाहन कायद्यात दुरुस्तीचा प्रस्ताव मांडला होता. त्यामध्ये सरकारी विभागाच्या १५ वर्षाहून जुन्या वाहनांना भंगारात काढावे, अशी तरतूद केली होती. त्या दृष्टीने आजची ही परिषद महत्वाची मानली जात आहे.

काय आहे स्क्रॅपिंग पॉलिसी?

सरकारी विभागाची वाहने म्हणजे सर्व मंत्रालयातील वाहनं, पोलिस, प्रशासनाकडून वापरण्यात येणारी वाहने, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि इतर विभागामध्ये १५ वर्षाहून जुनी भंगारात काढण्यात येतील. तसे एसटी आणि बेस्टच्या बस, सार्वजनिक उद्योगांतील वाहनेही भंगारात काढण्यात येतील. भंगारात गेलेल्या जुन्या साहित्याचा पुनर्वापर करता येईल आणि त्यामुळे वाहनांच्या किंमतीत घट होईल. या धोरणांतर्गत केंद्र सरकार पाच वर्षात दोन हजार कोटी रुपये खर्च करणार आहे.

स्क्रॅपिंग पॉलिसीमध्ये चार टप्पे

  • नवीन वाहन खरेदी केले तर पाच टक्क्यांपर्यंत सूट
  • जुन्या वाहनांसाठी फिटनेस सर्टिफिकेट आवश्यक
  • २०, १५ वर्ष जुन्या वाहनासाठी फिटनेस सर्टिफिकेट
  • ऑटोमेटेड फिटनेस सेंटर पीपीपी मोडमध्ये सुरु

स्क्रॅपिंग पॉलिसीचा फायदा काय? 

  • देशात वाहन क्षेत्रात मोठी वाढ होईल
  • वाहन क्षेत्राची उलाढाल सुमारे साडेचार लाख कोटी
  • पॉलिसी लागू झाल्यानंतर दहा लाख कोटीपर्यंत
  • देशात लाखो रोजगारांची निर्मिती होईल

Conference in Gujarat on Vehicle Scrapping Policy; Prime Minister Modi will guide

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात