विशेष प्रतिनिधी
चंडीगड – काँग्रेसने अपमानास्पदरीत्या मुख्यमंत्रिपदावरून हटविलेल्या कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला वेग दिला आहे. कॉंग्रेसच्या नेतृत्वाला धडा शिकवण्याचा त्यांनी जणू चंगच बाधला आहे.Capt. Amrindar singh ready to faught with cogress
जागावाटपासंदर्भात अमरिंदर हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना लवकरच भेटण्याची अपेक्षा आहे. काँग्रेसमधून अधिकृतरीत्या बाहेर पडण्याआधी अमरिंदर हे भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेत होते. तीन कृषी कायदे मागे घेतले जावेत अशी त्यांची मुख्य अट होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तशी घोषणा केल्यानंतर कार्यवाही झाली आहे. त्यामुळे अमरिंदर आणि भाजप यांच्यातील युतीचा मार्ग मोकळा झाला आहे.ते म्हणाले, जागावाटप तत्त्वतः ठरले आहे.
आपण विजयी उमेदवार निवडावेत आणि त्यांना पाठिंबा द्यावा असे मी दोन्ही पक्षांना म्हणालो आहे, असे त्यांनी सांगितले. या युतीतर्फे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार बनण्याची अपेक्षा आहे का, या प्रश्नावर त्यांनी स्पष्ट केले की, सर्व भागीदार पक्ष मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरवतील.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App