महाराष्ट्रातील सहकारी बॅँकेवर रिझर्व्ह बॅँकेची कारवाई, १० हजारांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: रिझर्व्ह बँकेने अहमदनगर येथील म्युनिसिपल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेवर बंदी घातलीय. रिझर्व्ह बँकेच्या निबंर्धानंतर नगर अर्बन सहकारी बँकेच्या ग्राहकांना 10 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही. या सहकारी बँकेच्या आर्थिक स्थितीत गडबड झाल्याची माहिती मिळाल्यानंतर आरबीआयने हे पाऊल उचलले.RBI action against co-operative bank in Maharashtra, no more than Rs 10,000 can be withdrawn

आरबीआयने बँकिंग रेग्युलेशन अ‍ॅक्ट (सहकारी संस्थांना लागू असलेल्या नियमांनुसार) 1949 अंतर्गत ही कारवाई केली. आरबीआयच्या या सूचनेनंतर निबंर्धांचा कालावधी पुढील 6 महिन्यांसाठी कायम राहणार आहे, जो 6 डिसेंबरपासून लागू झालाय.



रिझर्व्ह बँकेच्या निवेदनानुसार, 6 महिन्यांनंतर सहकारी बँकेच्या स्थितीचे मूल्यांकन केले जाईल आणि पुढील सूचनांचा विचार केला जाईल. सर्व काही सुरळीत झाले तर निबंर्धात शिथिलता येईल, अन्यथा परिस्थिती जैसे थेच राहील.

रिझर्व्ह बँकेच्या निदेर्शात म्हटले आहे की, नगर सहकारी बँक आरबीआयची मंजुरी घेतल्याशिवाय कोणत्याही कजार्चे नूतनीकरण किंवा पेमेंट करू शकत नाही किंवा नवीन कर्ज देऊ शकत नाही. म्युनिसिपल को-आॅपरेटिव्ह बँक कोणतीही गुंतवणूक करू शकत नाही, कोणतेही दायित्व पूर्ण करू शकत नाही किंवा कोणतेही पेमेंट जारी करू शकत नाही.

तसेच ही सहकारी बँक आरबीआयकडून सूचना मिळाल्याशिवाय तिच्या कोणत्याही मालमत्तेची विल्हेवाट लावू शकत नाही.आरबीआयच्या निदेर्शांनुसार, बचत बँक खाते किंवा चालू खात्यात जमा केलेल्या एकूण रकमेपैकी 10,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही.

आरबीआयच्या या निदेर्शाची प्रत बँकेच्या कंपाउंडमध्ये पेस्ट करण्यात आलीय. रिझर्व्ह बँकेच्या या निबंर्धाचा अर्थ नगर सहकारी बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे असा घेऊ नये, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. परवाना पूर्वीप्रमाणेच कायम आहे, परंतु काही बंधने चिकटवण्यात आलीत.

RBI action against co-operative bank in Maharashtra, no more than Rs 10,000 can be withdrawn

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात