Black Fungus : काळ्या बुरशीवरील औषधाचा तुटवडा लवकरच दूर होणार, आणखी ५ फार्मा कंपन्यांना उत्पादनाचा परवाना

Black Fungus Drug Amphotericin B Shortage Will Resolved Soon, Five More Pharma Companies Got Permission

केंद्रीय रसायन व खते राज्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी गुरुवारी सांगितले की, काळी बुरशी किंवा म्युकोरमायकोसिस आजारावरील औषध ‘अ‍ॅम्फोटेरिसिन बी’चा देशातील तुटवडा लवकरच दूर होईल. तीन दिवसांत या औषधाच्या निर्मितीसाठी आणखी पाच औषध कंपन्यांना परवाना देण्यात आलेला आहे. Black Fungus Drug Amphotericin B Shortage Will Resolved Soon, Five More Pharma Companies Got Permission


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : केंद्रीय रसायन व खते राज्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी गुरुवारी सांगितले की, काळी बुरशी किंवा म्युकोरमायकोसिस आजारावरील औषध ‘अ‍ॅम्फोटेरिसिन बी’चा देशातील तुटवडा लवकरच दूर होईल. तीन दिवसांत या औषधाच्या निर्मितीसाठी आणखी पाच औषध कंपन्यांना परवाना देण्यात आलेला आहे.

केंद्रीय मंत्री म्हणाले की, सध्या सहा कंपन्या या औषधाची निर्मिती करत आहेत. याव्यतिरिक्त आणखी पाच कंपन्यांना हे औषध तयार करण्यास परवानगी देण्यात आली आहे. विद्यमान कंपन्यांनीही उत्पादन वाढविणे सुरू केले आहे. सोबतच भारतीय कंपन्यांनीही या औषधाच्या सहा लाख व्हॉयल्सची ऑर्डर दिलेली आहे.

IMAचे पंतप्रधान मोदींना पत्र

तत्पूर्वी इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून देशातील औषध कंपन्यांना काळी बुरशी किंवा म्युकोरमायकोसिसचे औषधे तयार करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. संघटनेने पंतप्रधानांना आग्रह केला की, पंतप्रधानांनी डीसीआरजीला यासंबंधी देशातील पात्र औषध कंपन्यांना आपत्कालीन किंवा अल्प-मुदतीची परवाना देण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणीही केली होती.

Black Fungus Drug Amphotericin B Shortage Will Resolved Soon, Five More Pharma Companies Got Permission

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात