United States Recorded Highest Corona Deaths in a Single Day in the World, Not India, Read Details

Corona Deaths : कोरोनामुळे एका दिवसात सर्वाधिक मृत्यूचा रेकॉर्ड भारताच्या नव्हे, तर अमेरिकेच्याच नावावर, वाचा सविस्तर..

Corona Deaths : देशात कोरोना महामारीची दुसरी लाट सुरू आहे. या लाटेत एप्रिल ते मे महिन्याचे सुरुवातीचे दहा दिवस सर्वोच्च रुग्णसंख्येची नोंद झाली होती. आता देशातील दैनंदिन रुग्णसंख्येत घट आढळून येत असली तरी मृत्यूंच्या वाढलेल्या आकड्यामुळे चिंता वाढली आहे. नुकतेच भारतात एकाच दिवसात कोरोनामुळे 4500 मृत्यू झाल्याच्या बातम्या सर्वत्र झळकल्या होत्या. परदेशी माध्यमांसह काही देशातील माध्यमांनीही हा जगातील सर्वोच्च आकडा असल्याचे वृत्त छापले होते. परंतु, हे सत्य नाही. एका दिवसातील मृतांच्या सर्वोच्च संख्येबाबत आजही अमेरिकेचाच प्रथम क्रमांक आहे. United States Recorded Highest Corona Deaths in a Single Day in the World, Not India, Read Details


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशात कोरोना महामारीची दुसरी लाट सुरू आहे. या लाटेत एप्रिल ते मे महिन्याचे सुरुवातीचे दहा दिवस सर्वोच्च रुग्णसंख्येची नोंद झाली होती. आता देशातील दैनंदिन रुग्णसंख्येत घट आढळून येत असली तरी मृत्यूंच्या वाढलेल्या आकड्यामुळे चिंता वाढली आहे. नुकतेच भारतात एकाच दिवसात कोरोनामुळे 4500 मृत्यू झाल्याच्या बातम्या सर्वत्र झळकल्या होत्या. परदेशी माध्यमांसह काही देशातील माध्यमांनीही हा जगातील सर्वोच्च आकडा असल्याचे वृत्त छापले होते. परंतु, हे सत्य नाही. एका दिवसातील मृतांच्या सर्वोच्च संख्येबाबत आजही अमेरिकेचाच प्रथम क्रमांक आहे.

भारताच्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 19 मे रोजी देशातील कोरोनाच्या स्थितीबाबत दिलेल्या आकडेवारीनुसार, 24 तासांत देशभरात पहिल्यांदाच 4529 मृत्यूंची नोंद झाली होती. यानंतर विविध माध्यमांनी भारतात जगाच्या तुलनेत सर्वाधिक मृत्यू झाल्याच्या बातम्या दिल्या. परंतु हे सत्य नाही. प्रसिद्ध अमेरिकी माध्यम न्यूयॉर्क टाइम्सच्या डेटाबेसनुसार, जो गुगलवरही उपलब्ध आहे त्यात एका दिवसातील सर्वाधिक मृत्यूंची नोंद अमेरिकेच्या नावावर असल्याचे दिसते. अमेरिकेत कोरेानाची दुसरी लाट सर्वोच्च शिखरावर असताना फेब्रुवारी महिन्यात एकाच दिवसात 5 हजारांहून अधिक मृत्यूंची नोंद झालेली आहे. 4 फेब्रुवारी 2021 रोजी 5177 मृत्यू आणि 12 फेब्रुवारी 2021 रोजी 5463 मृत्यू ही संख्या आजही जगात सर्वाधिक आहे. (गुगलचा हा डेटाबेस तुम्हाला येथे क्लिक करून पडताळून पाहता येईल.)

United States Recorded Highest Corona Deaths in a Single Day in the World, Not India, Read Details

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2 लाख 76 हजार 261 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर यादरम्यान 3880 जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वात चांगली बाब म्हणजे गुरुवारी आढळलेल्या नव्या रुग्णसंख्येपेक्षा बरे होणाऱ्यांची संध्या जास्त होती. या काळात कोरोनामधून सुमारे 3 लाख 68 हजार 788 जण बरे झाले आहेत. 15 मेनंतर पहिल्यांदाच कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या 4 हजारांपेक्षा कमी झाली आहे.

सध्या देशातील एकूण कोरोना रुग्णसंख्या 2,57,71,405 च्या पुढे आहे. तर सक्रिय रुग्णांची संख्या 31,25,140 आहे. देशातील कोरोना साथीच्या आजारावर आतापर्यंत 2,23,48,683 जणांनी मात केली आहे. तर आतापर्यंत 2,87,156 जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले. येथे कोरोनामुळे आतापर्यंत तब्बल 84,371 मृत्यू झालेले आहेत.

जगभरात कोरोना विषाणूचा तब्बल 16.42 कोटी लोकांना संसर्ग झाला आहे. तर या महामारीत जगभरातील तब्बल 34.04 लाखांहून जास्त जणांचा मृत्यू झाला.

मे महिन्यातील भारतातील कोरोनाची स्थिती

19 मे 2021 : 2,76,261 नवीन रुग्ण आणि 3,880 मृत्यू
18 मे 2021 : 2,67,174 नवीन रुग्ण आणि 4,525 मृत्यू.
17 मे 2021 : 2,63,045 नवीन रुग्ण आणि 4,340 मृत्यू
16 मे 2021 : 2,81,860 नवीन रुग्ण आणि 4,092 मृत्यू
15 मे 2021 : 3,10,822 नवीन रुग्ण आणि 4,090 मृत्यू
14 मे 2021 : 3,26,123 नवीन रुग्ण आणि 3,879 मृत्यू
13 मे 2021 : 3,43,288 नवीन रुग्ण आणि 3,999 मृत्यू.
12 मे 2021 : 3,62,406 नवीन रुग्ण आणि 4,126 मृत्यू
11 मे 2021 : 3,48,529 नवीन रुग्ण आणि 4,200 मृत्यू
10 मे 2021 : 3,29,517 नवीन रुग्ण आणि 3,879 मृत्यू
9 मे 2021 : 3,66,499 नवीन रुग्ण आणि 3,748 मृत्यू
8 मे 2021 : 4,09,300 नवीन रुग्ण आणि 4,133 मृत्यू
7 मे 2021 : 4,01,326 नवीन रुग्ण आणि 4,194 मृत्यू
6 मे 2021 : 4,14,433 नवीन रुग्ण आणि 3,920 मृत्यू
5 मे 2021 : 4,12,618 नवीन रुग्ण आणि 3,982 मृत्यू
4 मे 2021 : 3,82,691 नवीन रुग्ण आणि 3,786 मृत्यू
3 मे 2021 : 3,55,828 नवीन रुग्ण आणि 3,438 मृत्यू
2 मे 2021 : 3,70,059 नवीन रुग्ण आणि 3,422 मृत्यू
1 मे 2021 : 3,92,562 नवीन रुग्ण आणि 3,688 मृत्यू

United States Recorded Highest Corona Deaths in a Single Day in the World, Not India, Read Details

महत्त्वाच्या बातम्या