वादग्रस्त ट्वीटनंतर शरजील उस्मानीविरुद्ध अंबडमध्ये गुन्हा दाखल, प्रभू रामचंद्राचा जयघोष करणाऱ्यांची दहशतवाद्यांशी तुलना भोवली

Fir Lodged Against Amu Ex Student Sharjeel Usmani In Ambad Jalna For Making Objectionable Tweet

Fir Lodged Against Amu Ex Student Sharjeel Usmani : अलिगड मुस्लिम विद्यापीठाचा माजी विद्यार्थी नेता शरजील उस्मानीच्या अडचणींत पुन्हा वाढ झाली आहे. आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी उस्मानीविरोधात एफआयआर दाखल केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, जालना जिल्ह्यातील अंबडमधील रहिवासी अंबादास अंभोरे यांनी शरजील उस्मानीविरुद्ध ट्विटरवर भगवान श्रीराम यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरल्याप्रकरणी तक्रार नोंदवली होती. Fir Lodged Against Amu Ex Student Sharjeel Usmani In Ambad Jalna For Making Objectionable Tweet


विशेष प्रतिनिधी

जालना : अलिगड मुस्लिम विद्यापीठाचा माजी विद्यार्थी नेता शरजील उस्मानीच्या अडचणींत पुन्हा वाढ झाली आहे. आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी उस्मानीविरोधात एफआयआर दाखल केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, जालना जिल्ह्यातील अंबडमधील रहिवासी अंबादास अंभोरे यांनी शरजील उस्मानीविरुद्ध ट्विटरवर भगवान श्रीराम यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरल्याप्रकरणी तक्रार नोंदवली होती.

या तक्रारीच्या आधारे अंबड पोलिसांनी बुधवारी रात्री उस्मानीविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 295-अ आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला, अशी माहिती पोलिसांनी दिली. तक्रारकर्ते अंभोरे हे हिंदू जागरण मंचाशी संबंधित आहेत.

शरजील उस्मानीने हरियाणातील मेवातमधील एका मुस्लिम तरुणाच्या हत्येप्रकरणी ट्वीट केले होते. या ट्वीटमध्ये त्याने या हत्येला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला. ट्वीटमध्ये त्याने जय श्रीराम म्हणणाऱ्यांची तुलना दहशतवाद्यांशी केल्याने देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

शरजीलने यापूर्वीही ओकली होती गरळ

यावर्षी फेब्रुवारी महिन्यात उस्मानीने पुण्यात आयोजित एल्गार परिषदेत उपस्थित असेच वक्तव्य केले होते. परिषदेत उस्मानीने एका विशिष्ट धर्माबद्दल वादग्रस्त भाष्य केले, ज्यामुळे राजकारण चांगलेच तापले होते. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरजील उस्मानीविरोधात राज्य सरकारकडे कारवाई करण्याची मागणी केली होती.

उस्मानी अलिगड मुस्लिम विद्यापीठाचा विद्यार्थी

शरजील उस्मानी हा उत्तर प्रदेशमधील आझमगडचा रहिवासी आहे. त्याचे वडील तारिक उस्मानी हे अलिगड विद्यापीठात प्राध्यापक आहेत. शरजील उस्मानी हा अलीगड मुस्लिम विद्यापीठाचा माजी विद्यार्थी नेता आहे. उस्मानी या विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेत होता, परंतु 2018 मध्ये त्याने शिक्षण सोडले. डिसेंबर 2019 मध्ये बाबरीशी संबंधित भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचे फोटो पोस्ट करून उस्मानी चर्चेत आला. त्यानंतर त्याने 2019 मध्येच देशभरातील सीएएविरुद्धच्या चळवळीत भाग घ्यायला सुरुवात केली. उस्मानीने उत्तर प्रदेश, दिल्ली, महाराष्ट्र यासह अनेक राज्यांत सीएए आणि एनआरसीविरोधात निदर्शनांमध्ये भाग घेतला आणि सरकारला हे कायदा मागे घेण्याची मागणी केली होती.

Fir Lodged Against Amu Ex Student Sharjeel Usmani In Ambad Jalna For Making

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात