Worlds Largest Iceberg Breaks Off In Antarctica As Glaciers Retreat

Worlds Largest Iceberg : जगातील सर्वात मोठा हिमखंड तुटून वेगळा, दिल्लीपेक्षाही तिप्पट मोठे आकारमान

Worlds Largest Iceberg : जागतिक तापमानवाढीचा पर्यावरणाला मोठा फटका बसल्याचे आपण यापूर्वीही पाहिले आहे. आता अंटार्क्टिका समुद्रात एक विशालकाय हिमखंड तुटून वेगळा झाला आहे. हा हिमखंड राष्ट्रीय राजधानी दिल्लीहूनही तिप्पट आकाराचा असल्याचे सांगण्यात येत आहे. हळूहळू हा विशालकाय हिमखंड वितळायला लागेल, यामुळे समुद्राच्या पाणीपातळीतही वाढ होईल, पर्यावरणाच्या दृष्टीने ही अत्यंत चिंतेची बाब आहे. Worlds Largest Iceberg Breaks Off In Antarctica As Glaciers Retreat


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : जागतिक तापमानवाढीचा पर्यावरणाला मोठा फटका बसल्याचे आपण यापूर्वीही पाहिले आहे. आता अंटार्क्टिका समुद्रात एक विशालकाय हिमखंड तुटून वेगळा झाला आहे. हा हिमखंड राष्ट्रीय राजधानी दिल्लीहूनही तिप्पट आकाराचा असल्याचे सांगण्यात येत आहे. हळूहळू हा विशालकाय हिमखंड वितळायला लागेल, यामुळे समुद्राच्या पाणीपातळीतही वाढ होईल, पर्यावरणाच्या दृष्टीने ही अत्यंत चिंतेची बाब आहे.

उपग्रह आणि विमानाने घेतलेल्या छायाचित्रांनुसार हे जगातील सर्वात मोठे हिमखंड आहे. याचा आकार स्पॅनिश बेट मालोर्काएवढा आहे. युरोपीय अंतराळ संस्थेने म्हटले की, आइसबर्ग ए-76 अंटार्क्टिकामध्ये रोने आइसशेल्फच्या पश्चिम भागातून वेगळे झाले आणि आता वेडेल सागरावर तरंगत आहे. अंतराळसंस्थेनुसार हे 170 किमी लांब आणि 25 किमी रुंद आहे.

हवामानातील बदलांमुळे अंटार्क्टिकातील बर्फाची चादरही गरम होत आहे. यामुळे हिमकडे वितळत आहेत. खासकरून वेडेल सागराच्या आसपास याचा परिणाम दिसत आहे. हिमकडे कमी होतात तेव्हा हिमखंड तुटून वेगळे होतात. आणि जोपर्यंत जमिनीशी धडकत नाहीत तोपर्यंत तरंगत राहतात.

गेल्या वर्षीही दक्षिण जॉर्जियामध्ये एक मोठा हिमखंड तुटला होता, वैज्ञानिकांनी असा अंदाज लावला की, हा खंड एका अशा द्वीपाशी धडकेल जो समुद्री सील आणि पेंग्विनचे प्रजननस्थळ आहे. परंतु ते धडकण्याऐवजी त्याचे आणखी तुकडे होत गेले.

या महिन्याच्या सुरुवातीस नेचर जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, 1880 पासून समुद्राच्या सरासरी पातळीत सुमारे नऊ इंचाने वाढ झाली आहे. या वाढीतील एक चतुर्थांश भाग ग्रीनलँड आणि अंटार्क्टिकाची आइस शीट वितळण्यामुळे, तसेच जमीन-आधारित हिमकड्यांच्या वितळण्यामुळे आहे.

Worlds Largest Iceberg Breaks Off In Antarctica As Glaciers Retreat

महत्त्वाच्या बातम्या