Congress State President Nana Patole Says If Nitin Gadkari Prime Minister We Would Be Happy in Press Conference in Mumbai

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, गडकरी महाराष्ट्राचे नेते, ते पंतप्रधान झाले तर आम्हाला आनंदच!

Congress State President Nana Patole : देशात सध्या कोरोना महामारीची दुसरी लाट सुरू आहे. यावरून विरोधक व सत्ताधाऱ्यांमध्ये खडाजंगी सुरू आहे. भाजपने नुकतीच काँग्रेसची कथित टूलकिट जगासमोर आणली होती. या टूलकिटद्वारे काँग्रेस पीएम मोदी व देशाची बदनामी करत असल्याचा आरोप करण्यात आला होता. अर्थात, काँग्रेसने हे सर्व आरोप फेटाळले होते. आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे. पटोलेंच्या मते भाजपमध्ये पंतप्रधान बदलाची चर्चा सुरू आहे. ते म्हणाले की, नितीन गडकरी हे महाराष्ट्राचे नेते आहे, ते पंतप्रधान झाले तर आम्हाला याचा आनंदच होईल. मुंबईत आयोजित एका पत्रकार परिषदेत त्यांनी हे विधान केले आहे. Congress State President Nana Patole Says If Nitin Gadkari Prime Minister We Would Be Happy in Press Conference in Mumbai


विशेष प्रतिनिधी

मुंबई : देशात सध्या कोरोना महामारीची दुसरी लाट सुरू आहे. यावरून विरोधक व सत्ताधाऱ्यांमध्ये खडाजंगी सुरू आहे. भाजपने नुकतीच काँग्रेसची कथित टूलकिट जगासमोर आणली होती. या टूलकिटद्वारे काँग्रेस पीएम मोदी व देशाची बदनामी करत असल्याचा आरोप करण्यात आला होता. अर्थात, काँग्रेसने हे सर्व आरोप फेटाळले होते. आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे. पटोलेंच्या मते भाजपमध्ये पंतप्रधान बदलाची चर्चा सुरू आहे. ते म्हणाले की, नितीन गडकरी हे महाराष्ट्राचे नेते आहे, ते पंतप्रधान झाले तर आम्हाला याचा आनंदच होईल. मुंबईत आयोजित एका पत्रकार परिषदेत त्यांनी हे विधान केले आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लसींच्या वेगवान निर्मितीसाठी दिलेल्या सल्ल्यावरही पटोलेंनी भाष्य केले आहे. ते म्हणाले की, “पंतप्रधान मोदींसमोर नितीन गडकरींचं चालतं की नाही ठाऊक नाही, परंतु आम्हाला वाटतं की नितीन गडकरी हे पंतप्रधान असायला हवे होते. कोट्यवधी लोक देशात मरत आहेत, पण मोदींना सोयरसुतक नाही,” असा आरोपही त्यांनी केला.

काँग्रेसची तथाकथित टूलकिट ही मोदी सरकारच्या बदनामीसाठी आहे, असा आरोप करत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देशात आता जरी लोकसभा निवडणुका घेतल्या तरी भाजपच्या 400च्या वर जागा येतील, असा विश्वास व्यक्त केला होता. यावर पटोले यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लोकसभा निवडणूक घेण्याची मागणी केली आहे. याचाच अर्थ मोदी अपयशी ठरले आहेत हे आता भाजपाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना कळून चुकले आहे. मोदींचा राजीनामा घेऊन गडकरींना पंतप्रधान करावे, अशी मागणी भाजपचेच काही नेते करत आहेत. चंद्रकांत पाटलांच्या मागणीला आमचा पाठिंबा असून त्यांनी मोदींना राजीनामा द्यायला सांगून निवडणुका घ्यायला सांगाव्यात. म्हणजे देशातील जनतेच्या मनात काय आहे आणि कोणाच्या किती जागा येतील ते ही कळेल,” असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी लगावला.

या पत्रकार परिषदेत नाना पटोले यांनी शेतकऱ्यांचे मुद्दे, खासकरून खतांच्या दरवाढीवर भाष्य केले. अन्यायकारक दरवाढीविरुद्ध काँग्रेस राज्यभर आंदोलने करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला होता. तथापि, पंतप्रधान मोदी यांनी देशभरातील खतांच्या वाढलेल्या किमतीबाबत उच्चस्तरीय बैठक घेतली. यात डीएपीच्या अनुदानात 140 टक्के वाढ करून शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणेच डीएपीची बॅग 1200 रुपयांना मिळणार असल्याचा निर्णय घेतला.

Congress State President Nana Patole Says If Nitin Gadkari Prime Minister We Would Be Happy in Press Conference in Mumbai

महत्त्वाच्या बातम्या