हा राष्ट्रीय चिन्हाचा अपमान असल्याचे म्हटले आहे.
विशेष प्रतिनिधी
चेन्नई : Tamil Nadu budget तामिळनाडू सरकारने २०२५-२६ च्या अर्थसंकल्पाच्या लोगोमध्ये रुपयाच्या अधिकृत चिन्हाऐवजी (₹) तमिळ अक्षरांचा वापर केल्याने वाद निर्माण झाला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष के अन्नामलाई आणि भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्यावर निशाणा साधला आणि हा राष्ट्रीय चिन्हाचा अपमान असल्याचे म्हटले.Tamil Nadu budget
अन्नामलाई यांनी तामिळनाडू सरकारवर निशाणा साधत म्हटले आहे की, एका तमिळ व्यक्तीने डिझाइन केलेले आणि संपूर्ण भारताने स्वीकारलेले रुपयाचे चिन्ह तामिळनाडू सरकारच्या २०२५-२६ च्या अर्थसंकल्पातून काढून टाकण्यात आले आहे. हे चिन्ह द्रमुकच्या माजी आमदाराचे पुत्र उदय कुमार यांनी डिझाइन केले होते. मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, तुम्ही आणखी किती मूर्खपणाचे निर्णय घेऊ शकता?
भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनीही या निर्णयावर टीका केली आणि लिहिले की, उदय कुमार धर्मलिंगम, एक भारतीय डिझायनर ते द्रमुकच्या माजी आमदाराचे पुत्र आहेत. त्यांनी भारतीय रुपयाचे चिन्ह डिझाइन केले, जे संपूर्ण भारतात स्वीकारले गेले, परंतु मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी तामिळनाडूच्या २०२५-२६ च्या अर्थसंकल्पातून हे चिन्ह काढून टाकले. हा तमिळ लोकांचा अपमान आहे. कुणी किती हास्यास्पद असू शकते.
तामिळनाडू सरकारच्या या निर्णयाबाबत राजकीय चर्चा तीव्र झाली आहे. विरोधी पक्ष याला राष्ट्रीय चिन्हाचा अपमान म्हणत आहेत, तर द्रमुक सरकार हा बदल तमिळ भाषेचा आदर म्हणून सादर करत आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App