धीरेंद्र शास्त्री यांनी मोदी सरकारला ‘हे’ आवाहनही केले आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र शास्त्री ( Dhirendra Shastri ) यांनी बांगलादेशातील सध्याच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी तेथील लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. धीरेंद्र शास्त्री यांनी जारी केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, “ते सध्या न्यूझीलंडमध्ये आहेत. बांगलादेशातील परिस्थिती त्यांना प्रसारमाध्यमांद्वारे कळली. तिथली परिस्थिती भयानक आहे. मोठ्या प्रमाणात गडबड आणि दगडफेक होत आहे. बांगलादेशची राजधानी ढाका येथे तीन ते चार लाख लोकांनी हिंसाचाराचा अवलंब केला आहे. यामुळे खूप वेदना होत असल्याचे त्यांनी सांगितले.
बांगलादेशात लवकरच शांतता प्रस्थापित व्हावी, यासाठी त्यांनी जागतिक शांततेची कामना केली आहे. ते म्हणाले की, प्रसारमाध्यमांमध्ये पाहिल्याप्रमाणे हिंदू बांधव संकटात आहेत, मंदिरांची तोडफोड केली जात आहे. बांगलादेशात राहणाऱ्या हिंदूंसाठी भारत सरकारने दरवाजे उघडावे, अन्यथा हे गरीब लोक कुठे जातील, असे आवाहन त्यांनी केले आहे. बांगलादेशातील हिंदूंसाठी दरवाजे उघडून त्यांना भारतात आश्रय देण्याचे आवाहन केंद्र सरकारला केले आहे.
बांगलादेशात हिंसाचाराचे वातावरण आहे. येथील हिंसाचारात आतापर्यंत १२५ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा देऊन देश सोडला. हिंसाचारात आपला देश सोडून गेलेल्या शेख हसीना सध्या भारतात आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more