त्या भारतात किती दिवस राहणार? ; जाणून घ्या, भारताने काय घेतली आहे भूमिका
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना ( Sheikh Hasina ) यांना मोठा धक्का बसला आहे. ब्रिटननंतर अमेरिकेनेही त्यांना राजकीय आश्रय देण्यास नकार दिला. अमेरिकेने शेख हसीनाचा व्हिसा रद्द केल्याच्या बातम्या येत आहेत. मात्र, शेख हसीना ज्या ज्या वेळी अडचणीत आल्या आहेत, त्यांनी भारताकडे मदत मागितली आहे.
सोमवारीही असाच प्रकार घडला, जेव्हा बांगलादेशातील हिंसक आरक्षणविरोधी आंदोलनाची आग त्यांच्या निवासस्थानी पोहोचली तेव्हा त्यांनी इमर्जन्सी लँडिंगसाठी भारताकडे मदत मागितली होती. बिघडलेली परिस्थिती पाहून भारताने ते मान्य केले. यानंतर हसीनाचे विमान गाझियाबादच्या हिंडन एअरबेसवर उतरले. हसीना सध्या भारतात सेफ हाऊसमध्ये आहेत. मात्र आता शेख हसीना भारतात किती दिवस राहणार हा प्रश्न आहे.
लोकसभेत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी मंगळवारी बांगलादेशातील परिस्थितीबद्दल सांगितले. ते म्हणाले की, ‘फार कमी वेळातच त्यांनी (शेख हसीना) भारतात येण्याची परवानगी मागितली. त्याच वेळी आम्हाला बांग्लादेश अधिकाऱ्यांकडून फ्लाइट क्लिअरन्ससाठी विनंती प्राप्त झाली. त्या काल (सोमवार) संध्याकाळी दिल्लीला पोहोचल्या.’ जेव्हा शेख हसीना यांचे विमान हिंडन एअरबेसवर उतरले. त्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल त्यांना भेटायला आले. एनएसए डोवाल यांनी शेख हसीना यांच्याशी बांगलादेशातील परिस्थिती आणि त्यांच्या भविष्यातील रणनीतीबद्दल चर्चा केली .
त्यानंतर त्या लंडनमध्ये राजकीय आश्रय घेऊ शकतात असे वृत्त समोर येत होते. मात्र, आता या प्रकरणी त्यांना केवळ ब्रिटनच नव्हे तर अमेरिकेतूनही धक्का बसला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारताने शेख हसीना यांना भविष्यातील कृती ठरवण्यास सांगितले आहे. त्यांच्या भारतातील वास्तव्याबाबत सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सरकारने हसीना यांना सांगितले आहे की त्या सध्या येथे राहू शकतात, परंतु त्यांना स्वतःची पुढील दिशा ठरवावी लागेल. भारताची बरीच गुंतवणूक बांगलादेशात होत असल्याने शेख हसीनाबाबत भारताला राजनैतिक पेचप्रसंगाचा सामना करावा लागत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more