बांगलादेशात हिंदूंवर हल्ले; केंद्र सरकारची त्यावर अधिकृत प्रतिक्रिया नाही; बांगलादेशी नौदल प्रमुखांचे दिल्लीत स्वागत


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : बांगलादेशात दुर्गा पूजेदरम्यान हिंदू समाजावर अनेक ठिकाणी हल्ले करण्यात आले. या हल्ल्यांमध्ये पाच जण मारले गेले. बांगलादेशच्या शेख हसिना वाजेद सरकारने सुमारे साडेचारशे जणांना अटक केली आहे. परंतु हिंदूंवर झालेल्या हल्ल्यासंदर्भात भारताची सरकारची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप पुढे दिसलेली नाही. Attacks on Hindus in Bangladesh; The central government has no official response; Bangladesh Navy Chief Welcomes to Delhi

या पार्श्वभूमीवर बांगलादेशचे नौदल प्रमुख ऍडमिरल मोहम्मद शाहीन इक्बाल भारताच्या दौर्‍यावर आले आहेत. त्यांनी आज सकाळी नॅशनल वॉर मेमोरियल येथे जाऊन भारतीय जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर ऍडमिरल मोहम्मद शाहीन इक्बाल यांनी भारताचे लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांची आर्मी हेड क्वार्टर्स मध्ये भेट घेतली.



दोन्ही देशांच्या लष्करी आणि नौदल संबंधांबद्दल दोन्ही प्रमुखांनी चर्चा केली. 1971 मध्ये बांगलादेशाची निर्मिती झाली. भारताने पाकिस्तानशी युद्ध जिंकून बांगलादेशला स्वतंत्र केले. या बांगलादेश निर्मितीचे हे 50 वे वर्ष आहे. या पार्श्वभूमीवर नौदल प्रमुख मोहम्मद शाहीन इक्बाल यांची ही भारत भेट आहे.

परंतु बांगलादेशात हिंदूंवर हल्ले होत असताना भारत सरकारने अजून कोणतीही प्रतिक्रिया देखील व्यक्त न करणे याविषयी मात्र सोशल मीडियावर संताप व्यक्त होताना दिसत आहे. याउलट बांगलादेशाच्या नवदल प्रमुखांचे अधिकृतरित्या दिल्लीत स्वागत होतानाही दिसत आहे, यावर नेटिझन्सनी टीकाटिप्पण्या केल्या आहेत.

Attacks on Hindus in Bangladesh; The central government has no official response; Bangladesh Navy Chief Welcomes to Delhi

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात