Asian Game 2023 : भालाफेकमध्ये नीरज चोप्राने पटकावले सुवर्ण पदक, तर किशोर जेनाने मिळवले रौप्य!

आशियाई क्रीडा स्पर्धेत नीरजचे हे सलग दुसरे सुवर्णपदक आहे.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली :  चीनमध्ये खेळल्या जाणाऱ्या आशियाई खेळ 2023 मध्ये भारतीय खेळाडूंनी आपली प्रतिभा दाखवली आहे. पुन्हा एकदा भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने दमदार  कामगिरी करत भारतासाठी सुवर्णपदक पटकावले आहे. भालाफेकच्या अंतिम सामन्यात भारताला दोन पदके मिळाली. नीरजने सुवर्ण तर भारताच्या किशोर कुमार जेनाने रौप्यपदक पटकावले आहे. Asian Games 2023  Neeraj Chopra wins gold medal in javelin Kishore Jena wins silver

आशियाई क्रीडा स्पर्धेत नीरजचे हे सलग दुसरे सुवर्णपदक आहे. किशोरनेही सर्वोत्तम कामगिरी करत रौप्यपदक पटकावले. या दोन खेळाडूंच्या पदकांमुळे आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या पदकांची संख्या आता 80 वर पोहोचली आहे.

भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी टीम पाठवली आहे आणि या स्पर्धेत 100 पदकांचा टप्पा ओलांडण्याचे लक्ष्य आहे. हांगझो आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचे घोषवाक्य “अब की बार, सौ पार” आहे.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात