दुर्घटनेनंतर रात्रभर बचावकार्य सुरू, अजूनही 6 ते 7 लोक अडकल्याची शक्यता
विशेष प्रतिनिधी
सुरत : गुजरातमधील सुरतमधील सचिन पाली परिसरात शनिवारी दुपारी सहा मजली इमारत कोसळली. ज्यामध्ये आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अपघातापासून आतापर्यंत बचावकार्य सुरू आहे. सुरतचे मुख्य अग्निशमन अधिकारी बसंत पारीक यांनी दिलेल्या माहितीनुसार, बचावकार्य रात्रभर सुरू होते. यादरम्यान इमारतीच्या ढिगाऱ्यातून सात मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. बचावकार्य अजूनही सुरू आहे.A six storey building collapsed in Surat Seven people died
सुरतचे पोलीस आयुक्त अनुपम गेहलोत यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य आपत्ती निवारण दल (SDRF) आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) च्या पथके बचाव कार्यात गुंतलेली आहेत. अजूनही 6 ते 7 लोक अडकल्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. आतापर्यंत तीन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. या अपघातात एक जण जखमी झाला असून, तो बचावला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही इमारत खूप जुनी आणि जीर्ण अवस्थेत होती. या सहा मजली इमारतीत 35 खोल्या होत्या. ज्यामध्ये पाच ते सहा कुटुंबे राहत होती. शनिवारी दुपारी ही इमारत कोसळली. यानंतर मदतकार्य सुरू करण्यात आले. यावेळी बचाव पथकाने इमारतीच्या ढिगाऱ्यातून 7 मृतदेह बाहेर काढले. रात्रभर बचावकार्य सुरू असून ते अजूनही सुरू आहे. ही इमारत एका परदेशी महिलेची असल्याचे सांगण्यात येत आहे. तर सुरतमधील कोणीतरी या इमारतीत भाड्याने खोल्या दिल्या होत्या.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App