विधानसभेसाठी महायुतीची तयारी; फडणवीसांनी प्रवक्त्यांचे टोचले कान, 200 जागा जिंकण्याचे गणितही सांगितले

Fadnavis also told the calculations of winning 200 seats, to the ears of spokesmen

विशेष प्रतिनिधी

मुंबई : लोकसभेनंतर आगामी विधानसभा निवडणुकांची तयारी राजकीय पक्षांनी सुरू केलेली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये पार पडला. या मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या सर्वच पदाधिकाऱ्यांना एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले. तर महायुतीतील सर्वच पक्षाच्या प्रवक्त्यांचे कानही टोचले. Fadnavis also told the calculations of winning 200 seats, to the ears of spokesmen

काय म्हणाले फडणवीस?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज आपलाच एकमेकांत विसंवाद दिसतो, आज आपलेच प्रवक्ते एकमेकांवर बोलत असतात. जर कुणाला बोलायची खुमखुमी असेल त्याने आपआपल्या नेत्यांना अगोदर विचारावे. त्यांच्या नेत्यांनी होकार दिला तर आपली खुमखुमी पूर्ण करावी, असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी नाव न घेता अमोल मिटकरींना टोला लगावला. यावेळी, अटलबिहारी वाजपेयी यांची कविता ऐकवली.

25 लाख मतं मिळाली की विजय आपलाच

लोकसभा निवडणुकीपेक्षा 25 लाख मतं आपल्याला मिळाली की आपण 200 जागा जिंकू एवढं पोटेंशियल आणि ताकद आपल्याकडे आहे. महायुती पूर्ण ताकदीने आता मैदानात उतरली आहे. आपल्याला लक्षात आलंय, ते दररोज खोटं बोलत होते, पण आपण गाफिल राहिलो. आपली लढाई फेक नेरेटीव्ह या चौथ्या पक्षासोबत होती, खोट बोल पण रेटून बोल या त्यांच्या पद्धतीचा परिणाम झाला आणि आपला पराभव झाला. सत्य चिरकाल असतं, असत्याला फार काळ नसतो. असत्यावर एक निवडणूक जिंकता येते, पण सातत्याने खोटं चालत नसतं. हे घरी नवरा-बायकोला तरी खरं बोलतात की नाही, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर निशाणा साधला.



लाडक्या बहि‍णींना मोलाचा सल्ला

गावोगावी ह्यांचेच लोकं फॉर्म घेऊन उभे आहेत, असे म्हणत विरोधकांच्या हुशारीवर देवेंद्र फडणवीसांनी निशाणा साधला. या योजनेत आता कुठल्याही अटी-शर्ती नाहीत. तुमच्याकडे रेशनकार्ड नसेल तरीही तुम्हाला योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. केवळ, हमी पत्र लिहून तुम्हाला या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. केवळ अर्ज भरताना लाडक्या बहि‍णींनी एक गोष्ट काळजीपूर्वक लिहिली पाहिजे, ती म्हणजे बँक खात्याचा नंबर, बँक खात्याचा नंबर चुकला तर पैसे बँक खात्यात येणार नाहीत. त्यामुळे, सर्वच महिला भगिनींनी योजनेचा लाभ घ्यावा, कारण आम्ही ही योजना महिलांना बाहेरा टाकण्यासाठी नाही तर योजनेत घेण्यासाठीच राबवत असल्याचं फडणवीसांनी म्हटलं.

महिला भगिनींसाठी अनेक योजना

आपण महिला भगिनींसाठी अनेक चांगले निर्णय घेतले. महिलांना एसटीमध्ये सवलत दिली, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमार्फत महिलांना मोफत गॅस वाटत करणार आहोत. तसेच, राज्यातील मुलींसाठी उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णयही आपण घेतला आहे. त्यामुळे, पदवी व पदविका शिक्षण घेणाऱ्या सर्वच विद्यार्थींनींना मोफत उच्चशिक्षण मिळणार आहे. सर्वच जाती-धर्माच्या मुलींना या माध्यमातून मोफत शिक्षण मिळेल, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच, घरात जन्म घेणाऱ्या मुलींसाठीही आपण योजना आणली. माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या माध्यमातून वयाच्या 18 व्या वर्षापर्यंत मुलीच्या नावे 1 लाख रुपये मिळणार आहेत, हेही त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांसाठीही योजना

राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने विविध योजना राबवल्या आहेत. त्यामध्ये, केवळ 1 रुपयांत पीक विमा देण्याचा निर्णय आम्ही घेतला. देशात सर्वाधिक पीक विमा आपल्या महाराष्ट्राने दिला आहे. याशिवाय वीज बिल माफीचा निर्णय, मागेल त्याला सौरपंपही देण्यात येत आहे. आपल्याच सरकारने दूध उत्पादकांसाठी प्रति लिटर 5 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला असून हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं आहे, असेही फडणवीसांनी म्हटले.

महाराष्ट्र दुष्काळमुक्त होईल

महाराष्ट्र सरकारने सिंचन क्षेत्रातही भरीव कामगिरी केली असून मागच्या पिढीने दुष्काळ पाहिला, पण पुढची पिढी दुष्काळ पाहणार नाही. महाराष्ट्र दुष्काळ अवर्षणमुक्त होईल, असेही फडणवीसांनी म्हटले.

Fadnavis also told the calculations of winning 200 seats, to the ears of spokesmen

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात