लक्ष्मण हाके म्हणाले- पवारांकडून माझे तिकीट फायनल होते पण नंतर काय झाले हे त्यांनाच ठाऊक

Laxman Hake said- My ticket was final from Pawar but only he knows what happened later

विशेष प्रतिनिधी

मुंबई : लोकसभा निवडणुकीत शरद पवारांकडून माझे तिकीट फायनल झाले होते, असा गौप्यस्फोट ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी केला आहे. माढा लोकसभा मतदारसंघातून लक्ष्मण हाके निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. त्या वेळी शरद पवार यांनी देखील आपल्याल तिकीट देण्याची भूमिका घेतली होती, अशी माहिती त्यांनी दिली. मात्र, वेळेवर तिकीट मिळाले नाही त्यामुळे त्यांनी माढा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. Laxman Hake said- My ticket was final from Pawar but only he knows what happened later

लोकसभा निवडणुकीत जनतेने तुम्हाला नाकारले असल्याचा प्रश्न पत्रकारांनी लक्ष्मण हाके यांना विचारला होता. मी ज्या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली, त्या मतदारसंघात मला 5 हजार मते मिळाली असल्याचे हाके यांनी सांगितले. आपला ओबीसी समाजाचा प्रतिनिधी त्या सभागृहात गेला पाहिजे ही भावना अद्यापही तेथील समाजात नसल्याचे हाके यांनी म्हटले आहे. धनगराने खासदार व्हायचे असते का? त्याने तिकीट मागायचे असते का? असा प्रश्न विचारले जात असून ही समाजातील फॅक्ट असल्याचे हाके यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही निवडणुका लढवल्या होत्या मात्र, त्यांनाही पराभव पत्कारावा लागला असल्याचे हाके यांनी सांगितले.

आमच्या ताटातील 27टक्के आरक्षण आम्हाला वाचवावे

संविधानने दिलेले ओबीसी आरक्षण सर्वच्च न्यायालय, राज्य मागासवर्ग आयोग हटवू शकत नाही त्यामुळे सरसकट कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसीत समाविष्टचा प्रयत्न केले जात आहे. राज्यात विचारवंत वणावा असल्याचे दिसून येते कारण ते आरक्षण मुद्द्यावर पुढे येऊन बोलत नाही. सत्तेतून पैसा आणि पैसेतून सत्ता ही विकासाची बेटे निर्माण झाली आहेत. राज्यातील परिस्थितीवर कोण बोलत नाही. राज्यातील २०० साखर कारखाने कोणाच्या ताब्यात आहे. एसटी, ओबीसी यांचे हक्काचे शासकीय जागा भरल्या जात नाही ही शोकांतिका आहे. धनगर आरक्षण यांना एसटी मधून आरक्षण देण्याबाबत भूमिका सोडलेली नाही. आमच्या ताटातील 27टक्के आरक्षण आम्हाला वाचवावे लागेल. राजकीय भूमिका सध्यातरी आमची नाही, मी छोटा कार्यकर्ता असल्याचेही लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे.

Laxman Hake said- My ticket was final from Pawar but only he knows what happened later

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात