Sunil Tatkare : श्रीकांत शिंदे केंद्रीय शिक्षणमंत्री होणार? खासदार सुनील तटकरेंनी दिले स्पष्टीकरण

Sunil Tatkare

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Sunil Tatkare केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यामुळे सीजेपीच्या आंदोलनाला यश मिळाले असून, या महत्त्वपूर्ण घडामोडीनंतर आता एक नवीन राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या शिक्षण खात्याचा अतिरिक्त कार्यभार प्रल्हाद जोशी यांच्याकडे सोपवण्यात आला असला तरी, भविष्यात या पदावर खासदार श्रीकांत शिंदे यांची वर्णी लागू शकते का, या सुरू असलेल्या चर्चेवर राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी भाष्य केले आहे.Sunil Tatkare

सुनील तटकरे यांना श्रीकांत शिंदे यांची वर्णी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या पदावर जाऊ शकतात का? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, तो निर्णय नरेंद्र मोदी, अमित शाह यांचा असतो. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला उज्वल असे यश महाराष्ट्रमध्ये मिळाले. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे 6 खासदार विलीन झाले. शिंदे साहेबांनी ताकद लोकशाहीच्या माध्यमातून सिद्ध केली. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होत असतो, त्या संदर्भात निर्णय एनडीएचे नेतृत्व घेत असते. नेमक्या किती जागा शिवसेनेला द्यायच्या, कोणत्या पक्षाला द्यायचे हा अधिकार त्यांचा आहे. तो दिल्यानंतर कोणाला मंत्री करावे, हा अधिकार एकनाथ शिंदे यांचा आहे, असे तटकरे यांनी म्हटले आहे.Sunil Tatkare



ठाकरेंच्या विजय सभेवर काय म्हणाले तटकरे?

मुंबईत आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी विजयी सभा घेतली. त्यावर प्रतिक्रिया देताना सुनील तटकरे म्हणाले, शेवटी कोणी कोणत्या विषयावरती काय भावना व्यक्त कराव्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानानुसार सर्वांना अधिकार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन दिवस विद्यार्थी संवाद केला. चर्चा करण्यासाठी निरोप पाठवले. नवीन पिढीमध्ये असलेल्या भावना याचा सन्मान मोदी करत आहेत. लोकशाहीच्या पद्धतीने निर्णय झाला असल्याचे तटकरे यांनी म्हटले.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का?

तसेच दोन्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे विलीनीकरण होणार आहे का, यावर उत्तर देताना सुनील तटकरे म्हणाले, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत यापूर्वीच सुप्रियाताई, श्रीकांत शिंदे यांनी मत व्यक्त केले आहे. परंतु, राजकारणामध्ये आपण म्हणतात त्याप्रमाणे आज तरी दोन्ही राष्ट्रवादी विलीन करण्याची चर्चा कुठेही नाही. योगयावेळी तशा प्रकारची चर्चा सुरू झाली तर त्यावेळी विचार करता येईल. मात्र आता विलीनीकरणाची चर्चा पूर्णपणे बंद आहे, असे तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.

Sunil Tatkare Responds to Rumors of Shrikant Shinde Becoming Union Education Minister

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात