उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा; गट ‘क’च्या रिक्त पदांची भरती MPSC मार्फत; पेपरफुटीचा कायदाही येणार

Big announcement by Deputy Chief Minister Devendra Fadnavis; Recruitment of Group 'C' vacancies through MPSC

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्य सरकारने 77 हजार 305 लोकांना नोकरी दिली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सरकारच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात 1 लाख पेक्षा जास्त भरती केली असून हा विक्रम असल्याचा दावा देखील देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. राज्य सरकारच्या वतीने गट ‘क’ च्या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राबवली जाणार असल्याची घोषणा देखील देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच पेपरफुटी संदर्भातील कायदा याच अधिवेशनात आणणार असल्याची घोषणा देखील त्यांनी केली आहे. Big announcement by Deputy Chief Minister Devendra Fadnavis; Recruitment of Group ‘C’ vacancies through MPSC



राज्य सरकारने भरती केलेल्या 77 हजार 305 पदांमध्ये कुठल्याही प्रकारचा घोटाळा झालेला नसल्याचा दावा देखील देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. गट ‘क’ च्या जागा आपण टप्पा टप्याने भरणार असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. राज्य मंत्रिमंडळाने गट ‘क’च्या जागा टप्प्या टप्प्याने एमपीएससीकडे वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सहा ते आठ महिन्यांचा कालावधी लागणार असल्याची महाती देखील त्यांनी दिली आहे. लोकांची मागणी होती त्याप्रमाणेच हा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने देखील याबाबत तयारी दर्शवली असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

परीक्षांमधील गैरप्रकाराबाबत नरेटीव्ह परसरवला जातोय

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नोकरभरती परीक्षांमधील गैरप्रकाराचा विषय गंभीर असून वास्तवात काय घडले आणि काय नरेटीव्ह पसरवला जात असल्याचा आरोप केला. मागच्या सरकारच्या काळात किती फुटले आणि काय फुटते याची जंत्री मी आणली असल्याचा इशारा देखील देवेंद्र फडणवीस यांनी दिला. आता परीक्षा या टीसीएसच्या केंद्रावर आणि आयबीपीएसतर्फे होतीत, अशी माहिती देखील त्यांनी दिली. पेपरफुटीच्या प्रकरणात एक गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती त्यांनी दिली. जो नरेटीव्ह तयार करण्याचा प्रयत्न होतो तो चुकीचा आहे. पेपर फुटी बाबत केंद्र सरकारने कायदा केल्यानंतर राज्य सरकारने देखील कायदा करण्याचा मनोदय मागच्या अधिवेशनात केला आहे. या अधिवेशनात पेपरफुटी विरोधात कायदा करणार असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Big announcement by Deputy Chief Minister Devendra Fadnavis; Recruitment of Group ‘C’ vacancies through MPSC

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात