चेहऱ्याचा मुद्दा राऊतांनी घट्ट धरला; पवारांना बाजूला सारून राहुलच्या नावाने गूळ लावला!!

विशेष प्रतिनिधी

पुणे : महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण??, या मुद्द्यावर सर्व वरिष्ठ नेत्यांमध्ये राजकीय घमासन माजलेले असताना संजय राऊत यांनी मात्र चेहऱ्याचा मुद्दा घट्ट धरला, पवारांना बाजूला सारून राहुलच्या नावाने गूळ लावला!! Sanjay Raut ditched pawar, praise rahul gandhi for leadership

याची कहाणी अशी :

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत अनपेक्षित यश मिळाल्यानंतर महाविकास आघाडीचा कॉन्फिडन्स वाढला त्यामुळे काँग्रेस आणि शिवसेना यांच्या दंडामध्ये “स्वबळ” संचारले. दोन्ही पक्षांनी आपापले मुख्यमंत्री पदाचे घोडे मैदानात आणले. पण दोन्ही पक्षांनी समोरच्या पक्षाचे पक्षाचे प्यादे नाकारले. पण तरीही संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव पुढे करायचे ते केलेच. ते काँग्रेसने नाकारले. दोन्ही पक्षांमध्ये संघर्ष उभा राहिला, पण त्यामुळे महाविकास आघाडीचे गरजवंत भीष्म पितामह शरद पवार यांची पंचाईत झाली. शरद पवारांनी वेळेची नजाकत ओळखून काँग्रेसची तळी उचलून धरून महाविकास आघाडीचा सामुदायिक नेतृत्वाचा चेहराच समोर असेल, असे सांगून उद्धव ठाकरेंचे नाव फेटाळून लावले.

मात्र त्यावर कडी करत आज संजय राऊत यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंचे नाव पुढे रेटले. पण यावेळी उद्धव यांचे नाव पुढे भेटताना राऊतांनी चतुराईने पवारांच्या मुद्द्याला बगल दिली. उलट त्यांनी राहुल गांधींच्या नावाने गूळ लावला. लोकसभा निवडणुकीमध्ये राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार केले असते, तर काँग्रेसच्या 25 ते 30 जागा वाढल्या असत्या. त्यामुळे मोदी सरकार पुन्हा येणे फारच अवघड बनले असते. म्हणून निवडणुकीला सामोरे जाताना चेहरा समोर ठेवूनच गेले पाहिजे. म्हणजे जनतेला समजते आपण कोणाला मतदान करतोय ते. जनतेने आत्तापर्यंत इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या नावावर मतदान केले, तसेच ते मोदींच्या नावावरही मतदान केले. त्यामुळे आपल्याला महाराष्ट्रात बिन चेहऱ्याने जाता येणार नाही हे महाविकास आघाडीने लक्षात ठेवावे, असे राऊत म्हणाले.

संजय राऊत त्यांनी या वक्तव्यातून शरद पवारांच्या सामुदायिक नेतृत्वाच्या वक्तव्याला छेद दिला आणि त्याचवेळी राहुल गांधींचे थेट नाव घेऊन महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांना विशिष्ट दबावाखाली आणले. राऊतांच्या या वक्तव्यामुळे उद्धव ठाकरेंचे नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत पुन्हा एकदा अग्रभागी आले.

Sanjay Raut ditched pawar, praise rahul gandhi for leadership

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात