वृत्तसंस्था
कोस्टारिका : जुआन सांतामारिया आंतरराष्ट्रीय विमानतळावर डीएचएल कंपनीचे मालवाहू विमान धावपट्टीवर कोसळले. त्यामुळे अनेक तास विएमा वाहतूक बंद होती. A DHL cargo plane crash landed at Costa Rica’s Juan Santamaria International Airport, forcing authorities to shut the airport for several hours.
ड्यूश पोस्ट एजी या कंपनीची डीएचएल उपकंपनी आहे. पिवळ्या रंगाचे हे मालवाहू बोईंग कंपनीचे हे विमान धावपट्टीवर उतरताना घसरले. या बाबतचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. विमान उतरल्यानंतर धावपट्टीवरून घसरले आणि गवताच्या परिसरात घुसले. त्याचे दोन भाग झाले, असे वाहतूक अधिकाऱ्यांनी सांगितले. पायलट आणि सहपायलट यांना बाहेर काढण्यात आले.
या घटनेचे विविध व्हिडिओ इंटरनेटवर फिरत आहेत. त्यात एक पिवळे विमान दिसत आहे. त्यावर DHL लिहिले आहे. त्याची शेपटी विलग झाली आहे आणि एक पंख तुटलेला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App