वृत्तसंस्था
नवी दिल्ली : विरोधकांनी देशात इलेक्टोरल बॉण्ड्स मुद्द्यावर मोठा हल्ला-गुल्ला चालवला आहे, पण त्यांनी संसदेत त्या बॉण्ड्सची प्रशंसाच केली होती. आज बाहेर ते त्याच्या विरोधात बोलत आहेत, पण प्रत्यक्षात ED ची कारवाई झालेल्या 16 कंपन्यांची तब्बल 63 % रक्कम विरोधी पक्षांना मिळाली आणि 37 % रक्कम भाजपला मिळावी, असा स्पष्ट खुलासा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केला. 63% of the 16 companies under ED action went to the opposition through electoral bonds
निवडणुकीत काळा पैशाचा खूप वापर होतो, असे आपण वर्षानुवर्ष ऐकत होतो. प्रत्येक पक्ष त्या विरोधात तोंडी बोलत असे, पण प्रत्यक्ष कृती विपरीत करीत असे. निवडणुकीतल्या काळ्या पैशाचा वापर थांबावा म्हणून एक प्रयत्नांचा भाग म्हणून इलेक्टोरल बॉण्ड्स आणले. संसदेत सर्व विरोधकांनी त्या प्रयत्नांचे स्वागतच केले होते, पण बाहेर मात्र ते त्या विपरीत बोलत आहेत, असे सांगून मोदी म्हणाले, एकूण 3000 कंपन्यांनी इलोक्टोरल बाँड्स खरेदी केले.
My interview to @ANI. https://t.co/35jNOT6zYl — Narendra Modi (@narendramodi) April 15, 2024
My interview to @ANI. https://t.co/35jNOT6zYl
— Narendra Modi (@narendramodi) April 15, 2024
यापैकी फक्त 26 कंपन्यांवर ईडी किंवा इन्कम टॅक्सच्या कारवाया झाल्या. त्या वेगवेगळ्या वेळी झाल्या. त्याच्याशी इलेक्ट्रोरल बाँड्सचा संबंध असेलच याची खात्री नाही, पण त्यातल्या ज्या 16 कंपन्यांवर ईडीची कारवाई झाली, त्या कंपन्यांची इलेक्ट्रोरल बॉण्ड्स वर खर्च केलेली रक्कम 63 % विरोधी पक्षांना मिळाली आणि 37 % रक्कम भाजपला मिळाली, याकडे मोदींनी लक्ष वेधले.
इलेक्टोरल बाँड्सच्या निर्णयात सुधारणा करता येणे शक्य होते. तशी सरकारची मानसिकता देखील होती पण विरोधकांची त्यासाठी तयारी नव्हती आता विरोधक भविष्यकाळात निश्चित पस्तावतील, असे भाकीतही मोदींनी वर्तविले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App