राज्य सरकार मध्ये पाच-सहा वर्षात एकही नोकर भरती का नाही नाना पटोले यांचा विधीमंडळात प्रश्न


विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्यात विविध विभागात लाखो पदे रिक्त असून मागील पाच सहा वर्षात सरकारी नोकर भरती झालेली नाही. महाराष्ट्रातील लाखोंच्या संख्येने असणारे बेरोजगार तरुण या भरतीची वाट पहात आहेत. विविध विभागातील ही लाखो रिक्त पदे भरण्यासाठी सरकारची काय योजना आहे? असा नाना पटोले यांनी विधानसभेत विचारला. Why not Recruitment of any servant in the State Government in five-six years Question of Nana Patole in the Legislature

नाना पटोले म्हणाले की, दरवर्षी नऊ टक्के कर्मचारी सेवेतून निवृत्त होत असतात. जो रिक्त पदांचा आकडा सांगितलेला आहे, तो कमी आहे. रिक्त पदांची संख्या यापेक्षा जास्त आहे. गेल्या पाच-सहा वर्षात एकही नोकर भरती झालेली नाही. विधानसभेतही कर्मचाऱ्यांचा मोठा बॅकलॉग आहे. कर्मचाऱ्यांची संख्या पुरेशी नसेल तर आपण जनतेला सेवा कशी देणार ?


भाजप-काँग्रेस पुन्हा आमने-सामने : पंतप्रधान मोदींच्या वक्तव्याविरोधात देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्याबाहेर आंदोलन, भाजप कार्यकर्त्यांचीही नाना पटोलेंच्या घराबाहेर घोषणाबाजी


पटोले म्हणाले की, मागील सरकारच्या काळातही नोकर भरती केली गेली नाही. रिक्त पदांची भरती लवकर होणे गरजेचे आहे. विविध विभागात रिक्त असलेल्या लाखो पदांची भरती करण्यासंदर्भात राज्य सरकारची काय योजना आहे? आणि किती दिवसात नोकर भरती करणार, असे प्रश्न पटोले यांनी उपस्थित केला.

राज्यात दोन लाख ३ हजार ३०२ पदे रिक्त आहेत. कोरोनामुळे मागील दोन वर्षात पदभरती झालेली नाही. शासन ही पदभरती करण्याबाबत सकारात्मक असून लवकर पदांची भरती केली जाईल, असे संबंधित मंत्री दत्ता भरणे यांनी सांगितले.

Why not Recruitment of any servant in the State Government in five-six years Question of Nana Patole in the Legislature

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात