WATCH : वेण्णा लेक परिसरात पर्यटकांची पावले वेण्णा लेक परिसरात पारा ६ अंशावर


विशेष प्रतिनिधी

सातारा – गेल्या दोन दिवसांपासून महाबळेश्वरमध्ये थंडीचा जोर वाढत चालला आहे. प्रसिद्ध वेण्णा तलाव परिसरात तर थंडी अधिकच जाणवत आहे. त्यामुळे पर्यटकांची पावले या परिसरात पडली आहेत.Venna Lake area is Tourist aatraction

आज पहाटे सहा वाजता वेण्णा लेकवर पारा घसरून सहा अंशावर आला आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह पर्यटक दिवसभर उबदार गरम कपडे,शाली, स्वेटर्स घालून फिरताना दिसत आहेत.अनेक ठिकाणी शेकोट्या पेटवून त्याभोवती नागरिक शेकत बसल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.



प्रसिद्ध वेण्णा लेकवर जणू धुक्याची चादरच पसरल्याचे दृश्य सध्या पाहायला मिळते आहे. सकाळी वेण्णा तलावावर गेलेले नागरिक मनमुरादपणे याचा आनंद लुटत आहेत. त्यामुळे महाबळेश्वरमधील थंडी अनुभवण्यासाठी जाऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांसाठी आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

  •  वेण्णा लेक परिसरात पर्यटकांची पावले
  •  धुक्याची चादरच पसरल्याचे दृश्य
  •  वेण्णा लेक परिसरात पारा ६ अंशावर
  •  महाबळेश्वरमधील थंडी अनुभवण्यासाठी लगबग

Venna Lake area is Tourist aatraction

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात