कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे RRR मुव्हीची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली?


 विशेष प्रतिनिधी

दिल्ली : रणवीर सिंग यांची प्रमुख भूमिका असणारा आणि कबीर खान दिग्दर्शित 83 हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला होता. या सिनेमासाठी 200 करोड रुपये खर्च करण्यात आले होते. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पूर्णपणे अयशस्वी ठरला. या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांमध्ये फक्त 50 कोटींची कमाई केली आहे.

RRR movie release date postponed due to Corona’s growing influence?

या चित्रपटाच्या अपयशानंतर शाहिद कपूरच्या जर्सी या चित्रपटाचे रिलीजदेखील पुढे ढकलण्यात आले आहे. तर RRR ह्या चित्रपटाचे रिलीज देखील पुढे ढकलण्यात येणार का? असा प्रश्न अनेकांना पडला होता. या सिनेमात अजय देवगण, राम चरण, तारक, आलीया भट्ट हे दिगग्ज कलाकार आहेत. 1920 च्या काळातील कथा ह्या सिनेमात दाखवण्यात आलेली आहे.

या पाश्र्वभूमीवर एसएस राजामौली यांचा RRR ह्या सिनेमाचे प्रदर्शन देखील पुढे ढकलले जाणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. या चित्रपटाच्या टीमने प्रमोशनही अगदी जोरात केलेले आहे. तर चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलले जाणार म्हणून चाहत्यांमध्ये निराशा पसरत होती.


RRR खतरनाक ! स्टँड टुगेदर : टीम एस. एस.राजामौली आलिया,अजय देवगणसह राम चरणचा स्पेशल संदेश


पण तरण आदर्श यांनी या सर्व गोष्टींवर आता पडदा टाकलेला आहे. एस एस राजामौली यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर तरण आदर्श यांनी ऑफिशियल स्टेटमेंट दिले आहे की RRR हा चित्रपट 7 जानेवारी 2022 रोजीच प्रदर्शित होणार. चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी हा निर्णय घेतलेला आहे. हा चित्रपट बनवण्यासाठी 450 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

नुकताच ओमायक्रॉन या व्हायरसचा वाढता संसर्ग आणि कोरोनाच्या वाढत्या केसेसमुळे अनेक राज्यांमध्ये निर्बंध लादण्यात आले आहेत. नाइट कर्फ्यू देखील अनेक राज्यांमध्ये चालू करण्यात आलेला आहे. 50 टक्के क्षमतेसह चित्रपटगृह चालू होणार आहेत. आता नाईट कर्फ्यू चालू केल्यामुळे रात्री सात नंतरचे सर्व शो कॅन्सल करावे लागणार. त्यामुळे चित्रपट निर्मात्यांचे प्रचंड मोठे नुकसान होऊ शकते.

RRR movie release date postponed due to Corona’s growing influence?

 

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण