मनसेची गरज नाही, १९९२ ला कॉँग्रेसची आणली होती तशी सत्ता भाजपसोबत मुंबईत आणू, रामदास आठवले यांचा विश्वास


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मनसेसोबत जाण्याची भाजपला काहीही गरज नाही. १९९२ साली आरपीआयच्या गटाने काँगेससोबत मुंबई महापालिकेत सत्ता आणली होती. यावेळी ही सत्ता आणू, असा दावा करत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे.There is no need for MNS, let’s bring power to Mumbai with BJP as it was brought by Congress in 1992, Ramdas Athavale believes

शिवसेनेनं काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससोबत राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर भाजप मनसेला जवळ करणार का? अशी चर्चा राज्यात गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. दोन्ही पक्षांच्या भेटीही अधून होत असतात. त्यामुळे हा विषय चर्चेतही येतो. मात्र, दोन्ही पक्षांनी सोबत येण्याबद्दलही भूमिका स्पष्ट केलेल्या आहेत.



अशातच केंद्रीय राज्यमंत्री आणि आरपीआय ए गटाचे नेते रामदास आठवले यांनी भाजपला मनसेची गरज नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. आठवले म्हणाले, मुंबई महापालिका निवडणुकीत आरपीआय भाजपासोबत असल्याने मनसेची भाजपला आवश्यकता नाही. ते मनाने आमच्या सोबत येणार नाही. 1992 साली आरपीआयच्या गटाने काँगेससोबत मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन केली होती. यावेळी ही सत्ता आणू.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारबद्दल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हे सरकार 10 मार्चनंतर सत्तेत नसेल असं विधान केलं होतं. त्यावर बोलताना रामदास आठवले म्हणाले, हे सरकार कधी पडणार हे माहीत नाही, पण हे सरकार पडले पाहिज, अशी भूमिका त्यांनी मांडली.

संजय राऊत माझे चांगले मित्र आहेत. त्यांच्या बोलण्यामुळे शिवसेनेवरच निगेटिव्ह परिणाम होतं आहे, असे त्यांनी सांगितले. प्रकाश आंबेडकर यांनी भाजपासाठी दारे बंद केली असली, तरी आमचे दरवाजे त्यांच्यासाठी खुले आहेत असे आवाहन आठवले यांनी केले.

There is no need for MNS, let’s bring power to Mumbai with BJP as it was brought by Congress in 1992, Ramdas Athavale believes

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात