तालिका अध्यक्षांचे नाव डाम्बरने लिहिले जाईल – अतुल भातखळकर


प्रतिनिधी

मुंबई : तालिका सभापती म्हणून भास्कर जाधवांचे नाव डाम्बरने लिहिले जाईल, टीकेमुळे पिसाळलेल्या वसूली सरकारची तंतरली… म्हणून झाली निलंबनाची कारवाई, असे भाजपचे अतुल भातखळकर यांनी सांगितले. The names of the speaker will be written with the asphalt : Atul Bhatkhalkar

तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की अन् शिवीगाळ प्रकरणी भाजपाच्या १२ आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.ते म्हणाले, भाजपच्या कोणत्याही आमदाराने धक्काबुक्की केली नाही. या उलट शिवसेनेच्या आमदाराने शिवीगाळ केली. हे स्वतः त्यांनी मान्य केले. मी तर डायसवर सुद्धा गेलो नव्हतो.खाली उभा होतो. मग मला जा निलंबित केले. मी रोज सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर टीका करतो. त्याची खुन्नस काढण्यासाठी आज त्यांनी निलंबनाचा मार्ग अवलंबला आहे.

उरलेल्या १०६ भाजप आमदारांना निलंबित केले तरी भाजप ओबीसी आरक्षणासाठी लढा देणारच आहे. त्यांचा राग देवेंद्र फडणवीस आणि भाजपावर अधिक आहे. त्यातून ही कारवाई केली गेली आहे. सरकारचा ढोंगीपणा बाहेर काढण्याच काम सातत्याने करत राहू.

The names of the speaker will be written with the asphalt : Atul Bhatkhalkar

 

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण