जनतेच्या मनातली सहानुभूती; ठाकरेंच्या शिवसेनेची 100 वर उडी!!; सुषमा अंधारेंचे वक्तव्य;… म्हणजे साधे बहुमतही नाही??


विशेष प्रतिनिधी

मुंबई : जनतेच्या मनातली सहानुभूती आणि ठाकरेंच्या शिवसेनेची 100 वर उडी!!; म्हणजे साधे बहुमतही नाही?? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.Sushma andhare claims sympathy wave in favour of Uddhav and aditya Thackeray, will bring 100 seats for Shivsena, does it means no absolute majority??

कारण शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनीच हे वक्तव्य केले आहे. महाविकास आघाडीच्या संयुक्त सभा महाराष्ट्रात ठिकठिकाणी होणार आहेत. त्यापैकी एका सभेच्या तयारीसाठी त्या लातूरला गेल्या होत्या. तिथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या विषयी महाराष्ट्रात प्रचंड सहानुभूतीची लाट आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे 100 आमदार निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.

आता खुद्द सुषमा अंधारे यांनीच हा विश्वास व्यक्त केल्याने वर उपस्थित केलेल्या प्रश्न निर्माण झाला आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या विषयी एवढी सहानुभूती आहे, तर महाराष्ट्रात शिवसेनेचे फक्त 100 आमदार निवडून येतील??, म्हणजे या सहानुभूतीच्या लाटेत उद्धव ठाकरे यांना शिवसेनेचा 145 आमदारांचा बहुमताचा आकडाही गाठता येणार नाही?? हा प्रश्न निर्माण झाला आहे.



 काँग्रेसचे इंदिरा लाटेत 415

वास्तविक सहानुभूतीची लाट म्हटली की ज्याच्या बाजूने ती असते, त्या पक्षाला नुसते बहुमच नाही, तर दोन तृतीयांश बहुमत देखील मिळते, असे देशातला इतिहास सांगतो. राजीव गांधींना इंदिरा गांधींच्या सहानुभूतीच्या लाटेत लोकसभा निवडणुकीत तब्बल 415 जागा मिळाल्या होत्या. आंध्र प्रदेशात वाय. एस. राजशेखर रेड्डी यांच्या सहानुभूतीच्या लाटेत वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांना दोन तृतीयांश बहुमत मिळाले आहे. याचा अर्थ जिकडे सहानुभूतीची लाट असते, तिकडे साध्या बहुमतापलिकडे त्या पक्षाची उडी पडते!! मग उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या बाबतीत शिवसेनेच्या फुटी नंतर जर एवढी मोठी सहानुभूतीची लाट आहे, तर त्यांच्या शिवसेनेची उडी 100 वरच कशी काय पडेल??, असा हा प्रश्न आहे आणि ती 100 वरच पडणार असेल, आणि महाराष्ट्र विधानसभेतले 145 चे साधे बहुमत मिळणार नसेल तर तिला सहानुभूतीची लाट तरी कसे म्हणता येईल??, हा दुसरा प्रश्न आहे!!

 राष्ट्रवादीचीही 100 ची महत्त्वाकांक्षा

पण शिवसेना काय किंवा राष्ट्रवादी काँग्रेस काय महाराष्ट्रातल्या या दोन्ही प्रादेशिक पक्षांच्या मूळात महत्त्वाकांक्षाच तोकड्या आहेत. कारण सुषमा अंधारे जरी आज शिवसेनेची उडी 100 वर पडेल असे म्हणत असल्या तरी राष्ट्रवादी काँग्रेसने तर आपले राजकीय ध्येयच मुळे महाराष्ट्रात 100 आमदार निवडून आणण्याचे ठेवले आहे. म्हणजेच त्यांना देखील स्वतःच्या बळावर महाराष्ट्रात बहुमत आणण्याची महत्त्वाकांक्षाच नाही, हे त्यांनी जाहीर करून टाकले आहे!!

काँग्रेस आणि बाकीच्यांच्या वाट्याला काय?

मग शिवसेनेचे 100 आणि राष्ट्रवादीचे 100 असे 200 आमदारांच्या जागा निवडून येणार असतील??, तर काँग्रेसच्या वाट्याला किती आमदार येतील आणि बाकीच्या पक्षांच्या वाट्याला किती जागा शिल्लक राहतील??, हा महाराष्ट्राच्या विधानसभे एवढा मोठ्ठा प्रश्न निर्माण होतो आहे!!

Sushma andhare claims sympathy wave in favour of Uddhav and aditya Thackeray, will bring 100 seats for Shivsena, does it means no absolute majority??

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात