एकीकडे सुशांत प्रकरणावरून आदित्यला घेरणे, दुसरीकडे सुषमा अंधारेंना पाठबळ देणे; नेमका अर्थ काय??


विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळात आज सीमा प्रश्नावरचा ठरावाचा मुद्दा आणि शिंदे फडणवीस सरकार मधील मंत्री अब्दुल सत्तार यांच्या जमीन घोटाळ्याचा मुद्दा गाजले असले तरी त्यापलिकडे दोन महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. किंबहुना त्या आता राजकीय दीर्घकालीन परिणामाच्या ठरण्याची शक्यता आहे. या घटना म्हणजे सुशांत सिंह राजपूत संशयास्पद मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरे यांना थेट घेरायला सुरुवात आणि दुसरीकडे सुषमा अंधारे यांना राजकीय पाठबळ देणे या होत. Reopening of Sushant Singh Rajput death case damage to Aditya Thackeray’s political future and support to Sushma Andhare damage control to NCP

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात कपूर रुग्णालयातला अहवाल बाहेर आला आहे आणि सुशांत सिंह राजपूत याची आत्महत्या नसून ती हत्या असल्याचा संशय या अहवालामुळे बळावला आहे. सुशांत सिंह राजपूत याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करणारी एका व्यक्तीने समोर येऊन उघडपणे प्रसार माध्यमांना सुशांत राजपूत याची आत्महत्या नसून ती हत्याच असल्याचे सांगितले आहे आणि त्याच्या मृतदेहावर मारल्याच्या खुणा कशा दिसत होत्या याचे वर्णनही माध्यमांसमोर केले आहे. यामुळे सुशांत सिंह राजपूत प्रकरणाला वेगळे वळण लागले असून संशयाची सुई आदित्य ठाकरे यांच्याकडे वळल्याचे स्पष्ट झाले आहे.



राज्य सरकारने दिशा सालियान आणि सुशांत सिंह राजपूत यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची चौकशी पुन्हा ओपन केली आणि ती कोणत्याही केंद्रीय तपास संस्थेकडे सोपवली तर त्यातून काही वेगळे सत्य बाहेर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण याचा एकूण राजकीय परिणाम आदित्य ठाकरे यांच्या भवितव्यावर होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

एकीकडे आदित्य ठाकरे यांना अशाप्रकारे घेरले जात असताना दुसरीकडे आज सकाळीच सुषमा अंधारे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी एक प्रकारे राजकीय पाठबळ दिले आहे. सुषमा अंधारे यांचे हिंदू धर्म, देव देवता, संत आणि वारकरी संप्रदाय यांच्यावरील टीकांचे जुने व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वारकरी समाज प्रचंड आक्रमक झाला. सुषमा अंधारे यांना संपूर्ण महाराष्ट्रातून विरोध सुरू झाला. या विरोधाचे राजकीय पडसाद मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात उमटायला लागल्यानंतर शरद पवारांनी सावध होत वारकऱ्यांची पुण्यात बैठक घेतली. त्यांना संयमाचा सल्ला दिला. एक प्रकारे यातून शरद पवारांनी सुषमा अंधारे यांना पाठबळ दिले आहे.

सुषमा अंधारे यांचा टीकेचा रोख देखील आता वारकरी संप्रदायावरून भाजपकडे आणि विशेषतः संघाकडे वळला आहे. आपले जुने व्हिडिओ व्हायरल करणारे खरे वारकरी नसून ते मोहन भागवत यांच्या संप्रदायाचे वारकरी असल्याची टीका सुषमा अंधारे करू लागल्या आहेत. याचा अर्थच त्यांना शिवसेनेपेक्षा वेगळ्या राजकीय प्लॅटफॉर्मवरून पाठबळ मिळाल्याचे यातून स्पष्ट होत आहे.

सुषमा अंधारे आता आपल्या टीकेचा सगळा रोख हा संघ आणि भाजप वर केंद्रित करत असताना दुसरीकडे शरद पवारांनी वारकऱ्यांनी संयम बाळगण्याचा सल्ला देणे म्हणजे सुषमा अंधारे यांच्या वक्तव्यांमुळे जे शिवसेनेचे नुकसान व्हायचे ते होवो, पण राष्ट्रवादीला पश्चिम महाराष्ट्रात डॅमेज होता कामा नये, असा याचा अर्थ होय. यासाठीच पवारांनी वारकऱ्यांची बैठक घेतल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

याचा अर्थ असाही आहे की, एकीकडे आदित्य ठाकरे यांना घेरून मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली या पट्ट्यात शिवसेनेला राजकीय फटका देणे आणि दुसरीकडे सुषमा अंधारे यांना राजकीय पाठबळ देतानाच वारकऱ्यांना संयम बाळगायला सांगून राष्ट्रवादीचा डॅमेज कंट्रोल करणे. हे समजून घेतले पाहिजे. त्यासाठी फार मोठ्या राजकीय अभ्यासाची गरज नाही. हे नेमके कोण करते आहे?? किंबहुना कोण घडवून आणत आहे??, हे सहजपणे “बिटवीन द लाईन्स” न वाचता ही समजू शकते!!

Reopening of Sushant Singh Rajput death case damage to Aditya Thackeray’s political future and support to Sushma Andhare damage control to NCP

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात