WATCH : खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ एसटी कामगारांच्या संपामुळे प्रवाशांनाही फटका


विशेष प्रतिनिधी

बीड – एसटीमध्ये खाद्यपदार्थ, पाणी बॉटल यासह इतर वस्तू विकून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या कामगारांवर एसटी बंदचा परिणाम दिसू लागलाय, ज्या ठिकाणी दिवसाला ६०० रुपये यांना पैसे मिळत होते. त्या ठिकाणी या कामगारांना केवळ १०० रुपये मिळवण्यासाठी दिवसभर कसरत करावी लागत आहे.ST workers agitatatin result to starvation food vendors : Hit the passengers too

बीड आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी चार तारखेपासून बेमुदत संप पुकारलाय, परिणामी सर्व एसटी सेवा ठप्प आहे. त्यामुळे यावर आधारित व्यवसाय करणारे कामगारांवर उपासमारीची वेळ आलीय. वेफर्स, भेळ, बिस्कीट, पाणी बॉटल यासह इतर खाद्यपदार्थ विकून ही मंडळी उदरनिर्वाह करतात.



मात्र, मागील बारा दिवसांपासून एसटी बंद असल्याने यांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागतोय. यातील अनेक कामगार पंधरा वर्षांपासून हाच व्यवसाय व्यवसाय करून उदरनिर्वाह करतात, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला बारा दिवस उलटून देखील तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे सरकारने वेळीच एसटी कामगारांच्या मागण्यांवर विचार करून हा संप मिटवावा, अशी भावना या कामगारांनी व्यक्त केली.

  • खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ
  • एसटी बंदचा परिणाम दिसू लागलाय
  • दिवसाला ६०० रुपये यांना पैसे मिळत होते
  • आता १०० रुपये मिळविण्यासाठी मारामार
  • संपाला बारा दिवस उलटून देखील तिढा कायम

ST workers agitatatin result to starvation food vendors : Hit the passengers too

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात