विशेष प्रतिनिधी
मुबंई : कंगना राणावत हे एक वादग्रस्त नाव झालेले आहे. नुकतंच तिने केलेल्या स्वातंत्र्य हे भीकमध्ये मिळाले होते या वक्तव्यावरून बराच मोठा वाद निर्माण झाला होता. हा वाद शमतो न शमतो तोच तिने आणखी एक वक्तव्य केले आहे. हे वक्तव्य तिने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेले आहे.
sanjay raut reacts on kangana’s statement on mahatma gandhi
कंगना म्हणते, महात्मा गांधीनी कधीही सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंग यांना कोणताही पाठिंबा दिला नाही. एक गाल पुढे केल्याने फक्त भीक मिळते, स्वातंत्र्य नाही. असे म्हणत तिने गांधीजींच्या ‘अहिंसा परमो धर्म’ या शिकवणीची खिल्ली उडवली होती. कंगणाच्या या वक्तव्यावर नुकताच संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यात केलेल्या भाषणाची आठवण करून दिली. उद्धव ठाकरे म्हणाले होते की, देशाला खरा धोका हा खोट्या हिंदुत्ववादी लोकांपासून आहे. ज्यावेळी निवडणुका येतात, त्यावेळी हे लोक हिंदू मुसलमान, भारत पाकिस्तान युद्ध बाहेर काढतात. त्याला मुद्दा बनवतात. आणि हे सर्वांना माहीत आहे की हे लोक कोण आहेत. याची आठवण संजय राऊत यांनी यावेळी करून दिली आहे.
कंगना राणावत विरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पोलीसात तक्रार दाखल करणार; नाना पटोले यांची माहिती
त्याचप्रमाणे ते म्हणतात की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा गांधी जयंती दिवशी राजघाटवर जाऊन गांधीजींच्या स्मारकावर श्रद्धांजली वाहतात. भारत आणि संपूर्ण जग गांधीजींच्या विचारांनी आजही प्रभावित आहे. गांधीजी हे विश्वाचे नायक होते. सध्या देशाची परिस्थिती अतिशय बिकट आहे. चीन भारतात घुसखोरी करत आहे. काश्मिरमध्ये पंडितांच्या हत्या होत आहेत. देशात काय परिस्थिती आहे हे कंगना मॅडमना माहीत असयला हवे होते. बाळासाहेब ठाकरे यांनीदेखील वेळोवेळी गांधीजींच्या विचारांवर टीका केली होती. पण त्यांनी कधीही गांधीजी हे स्वातंत्र्य संग्राम नायक आहेत हे मानायला नकार दिला नव्हता. त्यामुळे कंगनाने असे वागणे चुकीचे आहे. असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
कंगणाच्या या वक्तव्यानंतर कांग्रेस कडून तिला मिळालेला पद्मा पूरस्कार परत घेण्यात यावा ही मागणी करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App