शिवसेनेच्या पुढाकाराने सांगलीत एसटी धावली; व सैनिकांनी शहरी बसेसला दिले संरक्षण


विशेष प्रतिनिधी

सांगली – सांगली शहरामध्ये शिवसेनेच्या पुढाकाराने सांगली- मिरज मार्गावर एसटी बस धावली. शहरी वाहतुकीच्या प्रवासी बस आगारातून बाहेर पडल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला. st bus runed by shivsena on sangali- miraj road

शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास शिवसैनिकांच्या संरक्षणामध्ये सांगली ते मिरज या मार्गावर शहरी बसेस धावल्या. सांगली आगारात येवून एसटी बस रोखून दाखवाच शिवसेना स्टाईलने जशास तसे उत्तर देवू. असा सज्जड इशार पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला. शिवसेनाचे शहर प्रमुख महेंद्र चांडाळ यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक मोठ्या संख्येने सांगली आगारात जमा झाले होते. आगारप्रमुख यांच्याशी त्यांनी चर्चा केली. त्यानंतर एसटी कामगार सेनेच्या पदाधिकार्‍यांनी चालक व वाहकांना पाचारण करण्यात आले.फलाटवर लागलेली खाजगी वाहतूक हटवून गेल्या अनेक दिवसापासून डेपोत असणार्‍या शहरी बसेस अखेर फलाटावर लागल्या. सांगली ते मिरज या मार्गावर शिवसैनिकांच्या बंदोबस्तात बसेस सोडण्यात आल्या. त्यानंतर शिवसैनिकांनी मोठा जल्लोष करत जोरदार घोषणाबाजी केली.

  •  शिवसेनेच्या पुढाकाराने सांगलीत एसटी धावली
  • सांगली- मिरज मार्गावर एसटी बससेवा
  •  एसटी बस रोखून दाखविण्याचे आव्हान
  • शिवसेना स्टाईलने जशास तसे उत्तर
  • शिवसैनिकांच्या बंदोबस्तात बसेस सोडल्या

st bus runed by shivsena on sangali- miraj road

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी