एनसीबीच्या अज्ञात अधिकाऱ्याकडून एक पत्र मिळाल्याचा नवाब मलिक यांनी दावा केला आहे. पत्राचा फोटोही नवाब मलिक यांनी ट्विट केल आहे.’Special 26′ to be released soon – Nawab Malik
विशेष प्रतिनिधी
मुंबई : आर्यन खान प्रकरणात रोज नवे आरोप होत असून प्रकरणाला आता वेगळं वळण मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ‘एनसीबी’चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर सोमवारी आणखी काही आरोप केले. आज सकाळी-सकाळी नवं ट्विट करत नवाब मलिक अजून एक धक्का खुलासा करणार असल्याच सांगितलं.
एनसीबीच्या अज्ञात अधिकाऱ्याकडून एक पत्र मिळाल्याचा नवाब मलिक यांनी दावा केला आहे. पत्राचा फोटोही नवाब मलिक यांनी ट्विट केल आहे. या पत्रातील माहिती लवकरच ट्विटरद्वारे समोर आणणार असल्याचे नवाब मलिक यांनी ट्विट करत सांगितले आहे.
पत्राबाबतचे ट्विट करण्यापूर्वी नवाब मलिक यांनी आणखी ट्विट करत लवकरच स्पेशल 26 ची घोषणा करणार असल्याचा इशारा दिला. नवाब मलिक यांच्या ट्विटमुळं पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
Good Morning everyone,I am releasing soon…'SPECIAL 26' — Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) October 26, 2021
Good Morning everyone,I am releasing soon…'SPECIAL 26'
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) October 26, 2021
समीर वानखेडे यांच्या वडिलांचे नाव दाऊद, तर आईचे नाव झहिदा आहे. त्यांचा धर्म मुस्लिम आहे. त्यांनी खोटी कागदपत्रे सादर करून नोकरी मिळवली आहे’,असा खळबळजनक आरोप नवाब मलिक यांनी सोमवारी केला होता.तसंच,समीर वानखेडे यांच्या जन्म दाखलाच ट्विटरवर पोस्ट केला आहे.समीर वानखेडे यांनी नवाब मलिकांचे हे आरोप फेटाळले आहेत.
मलिकांनी फक्त दोन ओळींचे ट्वीट केलं .स्पेशल २६ अशा आशयाचं ट्वीट करत त्यांनी आपण लवकरच रिलीज करतोय,असंही त्यांनी ट्वीट मध्ये म्हटलं आहे. आता या प्रकरणात नवाब मलिक कोणते नवीन गौप्यस्फोट करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
नवाब मलिकांनी जन्म दाखल्यावरुन प्रश्न उपस्थित केल्यानंतर समीर वानखेडेंनी ते आरोप फेटाळून लावले होते. त्यावर नबाव मलिकांनीही पुन्हा वानखेडेंना लक्ष्य केलं आहे. त्यांनी ट्वीटरवर एक फोटो पोस्ट करत हे वानखेडे दाऊद कोण आहेत?,असा सवाल उपस्थित केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App