सावरकर मुद्दा : ठाकरे – राहुल गांधी वादात पवारांची “चलाख” मध्यस्थी; पण नेमकी कशासाठी??


विशेष प्रतिनिधी 

काँग्रेसचे निलंबित खासदार राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केल्यानंतर देशभरात संताप उसळलेला असताना स्वातंत्र्यवीर सावरकर हे त्यांच्या मृत्यूनंतर तब्बल 55 वर्षांनी भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आले आहेत. Savarkar insult issue : sharad Pawar’s intelligent mediation not save MVA, but to save his destroying “own political narrative”

पण राहुल गांधी “हॅबिच्युअल ऑफेंडर” असल्यासारखे सावरकरांचा अपमान करत सुटल्याने सावरकर देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आले आणि बाकीचे विरोधक अक्षरशः हादरून गेले आहेत. राहुल गांधी काँग्रेससाठी “पॉलिटिकल ऍसेट” मधून “पॉलिटिकल लायबिलिटी” मध्ये कन्व्हर्ट झालेच आहेत, पण ही “पॉलिटिकल लायबिलिटी” आपल्याला राजकीय दृष्ट्या भोवेल. त्याने आपले कधीही न भरून येणारे नुकसान होईल, याची भीती वाटल्यानेच बाकीचे विरोधक हादरले आहेत आणि परवा रात्री शरद पवारांनी शिवसेनेचा ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात मध्यस्थी केली आहे.

मल्लिकार्जुन खर्गे यांच्या घरी झालेल्या बैठकीत शरद पवारांनी सावरकरांविषयी विशिष्ट माहिती देऊन त्यांना माफीवीर ठरविणे कसे अयोग्य आहे, याचे वर्णन केले. सावरकर हा मुद्दा अनावश्यक आणि अस्थानी उचलू नये, हे राहुल गांधी आणि सोनिया गांधींना पटवून दिले. राहुल गांधींना हे पटल्याचे सकृत दर्शनी तरी दिसले. त्यामुळेच त्यांनी आपली सावरकरांवर ची सगळी जुनी ट्विट आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून हटविल्याचेही दिसून आले आहे.

पण मूळात सावरकर हा मुद्दा गेल्या कित्येक वर्षांपासून थंड्या बस्त्यात गेला असताना आणि निवडणुकीच्या मतांच्या राजकारणाच्या दृष्टीने तो गौण असताना अचानक असे काय घडले की तो मुद्दा भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी यावा!!, याचीच नेमकी शरद पवार आणि बाकीच्या चतूर विरोधकांना भीती वाटली आहे. म्हणूनच पवारांनी मध्यस्थीचा मध्यम मार्ग स्वीकारल्याचे दिसत आहे.



खरेतर सावरकरांचा मुद्दा हा निवडणुकीपलिकडचा किंबहुना देशाचे राजकीय बौद्धिक नॅरेटिव्ह सेटिंगचा मुद्दा आहे. सावरकरांचा हिंदुत्ववाद एकीकडे आणि बाकी सगळ्या राजकीय विचारवंत नेत्यांचे विविध धर्मनिरपेक्ष वाद एकीकडे अशी देशाची उभी वैचारिक मांडणी आहे. काँग्रेस संपूर्ण पणे सत्तेवर काबीज असताना सावरकर वाद आणि सावरकरी हिंदुत्व पराभूत अवस्थेत होते ही वस्तुस्थिती आहे. पॉलिटिकल नॅरेटिव्हमधले हिंदुत्व हे त्यावेळी बॅकबेंच वर होते. पण त्याचे मूलभूत वैचारिक कसदार अस्तित्व हे कधीच नाकारता येणाऱ्या सारखे नव्हते. त्यामुळे सत्तेविना सावरकरांचे हिंदुत्व सुप्तावस्थेत राहिले, पण जशी हिंदुत्ववाद्यांची सत्ता देशात आली, तसा सावरकरी हिंदुत्वाचा मुद्दा उफाळून वर आला आणि त्यामुळे काँग्रेसच्या धर्मनिरपेक्ष नॅरेटिव्ह सेटिंगला अक्षरशः चूड लागला…!! इथेच राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचा राजकीय संतापाचे मूळ कारण आहे. पण हे जेव्हा काँग्रेस आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या इतर विरोधी पक्षांना आणखी धोक्याच्या गर्तेत लोटेल, याची भीती वाटली तेव्हाच शरद पवारांनी मध्यस्थी केली आहे.

 पवारांचे नॅरेटिव्ह सेटिंग

महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले, तर पवारांनी गेल्या किमान 20 वर्षांमध्ये फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र हे पॉलिटिकल नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात ते काही प्रमाणात यशस्वी देखील झाले आहेत. पण सावरकरांचा अपमानाचा मुद्दा सतत पेटत आणि तेवत राहिला तर आपल्या पॉलिटिकल नॅरेटिव्हला धक्का बसण्याचा धोका आहे, हे पवारांसारख्या सजग चाणाक्ष नेत्याने ओळखले आणि त्यांनी या प्रकरणात मध्यस्थीचा मार्ग पत्करला आहे.

 पवारांच्या भाषणाचे रहस्य

सावरकर हे महात्मा गांधींसारखे चलनी नाणे बनत आहे, हे पवारांच्या लक्षात यायला वेळ लागलेला नाही. जोपर्यंत सावरकर हे महाराष्ट्रातल्या अनेक विचारवंतांपैकी एक आणि महत्त्वाचे स्वातंत्र्यवीर असे नॅरेटिव्ह सेट होते, तोपर्यंत ते पवारांना चालत होते. म्हणूनच 1989 मध्ये तत्कालीन उपराष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांच्या हस्ते सावरकर स्मारकाचे उद्घाटन झाले त्या कार्यक्रमातले मुख्यमंत्री म्हणून शरद पवारांचे भाषण हे आजही युट्युब वर उपलब्ध आहे. त्यात पवारांनी सावरकरांचा त्यांच्या विशिष्ट पद्धतीने गौरव देखील केला आहे.

पण राहुल गांधींनी सावरकरांचा वारंवार अपमान करून त्यांना जे देशाच्या आणि पर्यायाने महाराष्ट्राच्या पॉलिटिकल नॅरेटिव्ह सेटिंगच्या मध्यवर्ती बिंदूवर आणून ठेवले आहे, हा पवारांना खऱ्या अर्थाने धोका वाटला आहे. आणि म्हणूनच सावरकरांचा मुद्दा राहुल गांधींनी वारंवार उकरून काढू नये यासाठी पवारांनी त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने चलाख मध्यस्थी केली आहे.

 पवार चलाख, तरीही…

अर्थात पवार कितीही चलाख असले आणि महाराष्ट्रातले त्यांचे पॉलिटिकल नॅरिटीव्ह सेटिंग उद्ध्वस्त होण्याचा धोका त्यांनी ओळखला असला तरी या सगळ्याला मूळातच खूप उशीर झाला आहे. सावरकरांच्या प्रखर बुद्धिवादी हिंदुत्वाने सत्तेवरच्या सर्वांची बुद्धी आणि मने आधीच काबीज केली आहेत. कारण त्यांचे हिंदुत्व बुद्धिवादाच्या आणि काळाच्या कसोटीवर पूर्ण उतरले आहे. सध्याच्या राज्यकर्त्यांच्या संरक्षण, परराष्ट्र या धोरणांमध्ये त्याचे नावासह प्रतिबिंब पडले आहे. सध्याचे राज्यकर्ते त्यांच्याविषयी ही कृतज्ञता बाळगून ठामपणे सावरकरी हिंदुत्वाचा उघड पुरस्कार करीत आहेत. त्यामुळे पवारांची मध्यस्थी ही तात्पुरती महाविकास आघाडी वाचविण्यासाठी असली आणि प्रत्यक्षात महाविकास आघाडी टिकली तरी पॉलिटिकल नॅरेटिव्ह सेटिंगसाठी ती पुरेशी नाही. किंबहुना ती पराभवाच्याच अवस्थेत पोहोचली आहे, ही वस्तुस्थिती मान्य करावी लागेल!!

Savarkar insult issue : sharad Pawar’s intelligent mediation not save MVA, but to save his destroying “own political narrative”

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात