प्रतिनिधी
अकोला : येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आदर्श संस्कार मंडळ द्वारा संचालित श्रीमती शोभादेवी गोयनका कोविड केअर सेंटरला रा.स्व.संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी यांनी भेट देऊन पाहणी केली. सामाजिक दायित्व भावनेतून चालणाऱ्या प्रकल्पातील विविध व्यवस्थांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. RSS leader bhaiyyaji joshi visits akola covid center run by RSS
रा. स्व. संघाचे भैय्याजी जोशी यांनी शोभादेवी गोयनका कोविड केअर सेंटरला सदिच्छा भेट दिली. येथे एकुण अलगिकरणासाठी 44 तर प्राणवायूयुक्त 26 खाटांची व्यवस्था आहे.
हा प्रकल्प ना नफा ना तोटा या तत्वावर कार्यरत असून, येथील सर्वच व्यवस्थांची पाहणी करून भैय्याजी यांनी आनंद व्यक्त केला तर उपचारानंतर सुटी झालेल्या रुग्णाला सतत प्राणवायू देणारे तुळस रोप भेट देऊन प्राणवायूचे महत्व अधोरेखित केले जाते या उपक्रमाचे त्यांनी विशेष कौतुक केले.
यावेळी विभाग संघचालक प्रा.नरेंद्र देशपांडे, महानगर संघचालक गोपाल खंडेलवाल,प्रकल्पाचे वैद्यकीय संचालक डॉ. सदानंद भुसारी, डॉ. तुषार चरखा, प्रकल्प प्रमुख मोहन मिश्रा, सह प्रमुख भूषण पिंपळगावकर,महानगर कार्यवाह रुपेश शहा, आदर्श संस्कार मंडळाचे सचिव शशांक जोशी, अकोला अर्बन बँकेचे उपाध्यक्ष शंतनू जोशी आदी उपस्थित होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App