नाशिक मध्ये हनुमान चालिसावर निर्बंध


विशेष प्रतिनिधी

मुंबई : लाऊडस्पीकरच्या वादातून नाशिक प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. आता लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा किंवा भजन वाजवण्यासाठी परवानगी घ्यावी लागणार आहे. नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडे म्हणाले की, अजानच्या आधी आणि नंतर १५ मिनिटे परवानगी दिली जाणार नाही. इतकेच नाही तर मशिदीच्या १०० मीटरच्या आत हनुमान चालीसा लावण्यास परवानगी नाही. Restrictions on Hanuman Chalisa in Nashik

कायदा व सुव्यवस्था राखणे हा या आदेशामागचा उद्देश असल्याचे नाशिक आयुक्तांनी सांगितले. ते म्हणाले की, सर्व धार्मिक स्थळांना 3 मे पर्यंत लाऊडस्पीकर वापरण्याची परवानगी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 3 मे नंतर आदेशाचे कोणी उल्लंघन करताना आढळून आल्यास, उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.

महाराष्ट्रातील लाऊडस्पीकरच्या वादाच्या पार्श्वभूमीवर गृह विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. आता राज्यातील पोलिसांच्या परवानगीनंतरच धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकरचा वापर करण्यास परवानगी दिली जाणार आहे. यासंदर्भात महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे आज डीजीपी आणि पोलिस आयुक्तांची बैठक घेणार आहेत. यासंदर्भात ते मार्गदर्शक तत्त्वे जारी करतील, असे मानले जात आहे. याशिवाय ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत बैठक घेणार आहेत.

Restrictions on Hanuman Chalisa in Nashik

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात