Jioचे नेटवर्क डाऊन : सकाळी 9.30 पासून Jioच्या नेटवर्कमध्ये समस्या, कॉल आणि इंटरनेट वापरकर्ते त्रस्त

Reliance Jio Network Down multiple twitter users reporting connectivity issue

Reliance Jio Network Down : रिलायन्स जिओ नेटवर्कच्या सेवेत अडथळे येत आहेत. बुधवारी सकाळी 9.30 वाजल्यापासून नेटवर्कसंदर्भात समस्या आहेत. ज्या अद्याप दुरुस्त झालेल्या नाहीत. यामुळे जिओचे हजारो ग्राहक नाराज झाले आहेत. ग्राहक कॉल करू शकत नाहीत किंवा इंटरनेट वापरण्यास सक्षम नाहीत. मात्र, आतापर्यंत जिओकडून या प्रकरणी कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही. Reliance Jio Network Down multiple twitter users reporting connectivity issue


प्रतिनिधी

मुंबई : रिलायन्स जिओ नेटवर्कच्या सेवेत अडथळे येत आहेत. बुधवारी सकाळी 9.30 वाजल्यापासून नेटवर्कसंदर्भात समस्या आहेत. ज्या अद्याप दुरुस्त झालेल्या नाहीत. यामुळे जिओचे हजारो ग्राहक नाराज झाले आहेत. ग्राहक कॉल करू शकत नाहीत किंवा इंटरनेट वापरण्यास सक्षम नाहीत. मात्र, आतापर्यंत जिओकडून या प्रकरणी कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही.

जिओच्या नेटवर्कमधील समस्यांबाबत देशाच्या विविध भागांतून तक्रारी येत आहेत. मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक या राज्यांमधून या तक्रारी येत आहेत. जिओच्या नेटवर्कमधील समस्यांनंतर, #jiodown काही मिनिटांतच ट्विटरवर ट्रेंड करण्यास सुरुवात झाली.

आतापर्यंत या हॅशटॅगसह नेटवर्कच्या तक्रारीसंदर्भात हजारो ट्विट्स आले आहेत. जिओच्या आधी, फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामदेखील सोमवारी रात्री उशिरा 6 तास बंद होते. तीन दिवसांत हे दुसरे प्रकरण आहे.

देशभरात जिओचे 44.32 कोटी युजर्स

ट्रायच्या मते, जुलै 2021 मध्ये जिओच्या एकूण मोबाइल वापरकर्त्यांची संख्या 44.32 कोटी झाली आहे, एअरटेलचे 35.40 कोटी ग्राहक आहेत आणि व्होडाफोन-आयडियाचे 27.19 कोटी ग्राहक आहेत.

40% युजर्सना मोठी समस्या

रिअल-टाइम माहिती प्रोव्हायडर डाऊन डिटेक्टरच्या मते, हजारो जिओ वापरकर्ते नेटवर्कशी संबंधित समस्यांना तोंड देत आहेत. आतापर्यंत 4 हजार लोकांनी तक्रारी केल्या आहेत. यापैकी 40% युजर्सच्या स्क्रीनवर कोणताही सिग्नल संदेश येत नाही.

Reliance Jio Network Down multiple twitter users reporting connectivity issue

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात