लखीमपूर खीरीप्रकरणी काउंटर एफआयआर दाखल, भाजप कार्यकर्त्याने हत्या, प्राणघातक हल्ला आणि गोंधळाचे केले आरोप

counter FIR in lakhimpur kheri violence bjp worker sumit jayaswal lodges case against unknown

lakhimpur kheri violence : लखीमपूर खीरी हिंसाचारप्रकरणी काउंटर एफआयआर नोंदवण्यात आला आहे. हा एफआयआर भाजप कार्यकर्ता सुमीत जयस्वाल यांनी दाखल केला आहे. एफआयआरमध्ये कोणाचेही नाव नाही, परंतु अज्ञात लोकांविरुद्ध हत्या, प्राणघातक हल्ला आणि दंगलीच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. counter FIR in lakhimpur kheri violence bjp worker sumit jayaswal lodges case against unknown


वृत्तसंस्था

लखनऊ : लखीमपूर खीरी हिंसाचारप्रकरणी काउंटर एफआयआर नोंदवण्यात आला आहे. हा एफआयआर भाजप कार्यकर्ता सुमीत जयस्वाल यांनी दाखल केला आहे. एफआयआरमध्ये कोणाचेही नाव नाही, परंतु अज्ञात लोकांविरुद्ध हत्या, प्राणघातक हल्ला आणि दंगलीच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एफआयआरमध्ये, सुमीत जयस्वाल यांनी म्हटले आहे की, ते कुस्ती स्पर्धा आणि 03 ऑक्टोबर 2021 रोजी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या बनवारीपूर येथील गावात आयोजित एका मोठ्या जाहीर सभेमध्ये सहभागी होते. राज्याचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते.

पुढे लिहिले आहे की, भाजप कार्यकर्ते मौर्य यांच्या स्वागतासाठी कालेशरण मोडला जात होते. यावेळी ते थार महिंद्रा वाहन क्रमांक UP31AS1000 मध्ये स्वार होते, हे वाहन चालक हरिओम चालवत होता. एफआयआरनुसार, सुमीत त्यांचे मित्र शुभम मिश्रासोबत वाहनात होते.

सुमित यांनी पोलिसांना सांगितले की, त्यांची गाडी टिकुनिया वळणावर पोहोचताच, आंदोलन करणाऱ्या लोकांनी वाहनावर लाठ्या आणि विटांनी हल्ला केला, त्यात चालक हरिओम गंभीर जखमी झाला. यानंतर चालकाने गाडी थांबवली. सुमितने म्हटले आहे की यानंतर लोकांनी ड्रायव्हर हरिओमला कारमधून ओढले आणि त्याच्यावर लाठ्या, काठ्या आणि तलवारीने हल्ला केला.

counter FIR in lakhimpur kheri violence bjp worker sumit jayaswal lodges case against unknown

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात