स्वतःचे राज्य सोडून मुख्यमंत्री भूपेश बघेल उत्तर प्रदेशात; छत्तीसगडच्या कवरधामध्ये दंगल, कर्फ्यू


वृत्तसंस्था

रायपुर : स्वतःचे राज्य छत्तीसगड सोडून मुख्यमंत्री भूपेश बघेल हे उत्तर प्रदेशात जात आहेत. दुसरीकडे छत्तीसगडच्या कवरधामध्ये दंगल, कर्फ्यू लागू असताना ते उत्तर प्रदेशातील हिंसाचार ग्रस्त भागाचा दौरा करत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. Chief Minister Bhupesh Baghel leaves his own state in Uttar Pradesh; Riots, curfew in Chhattisgar

त्तीसगडच्या कवरधामध्ये येथे जातीय दंगल उफाळून आली आहे. बारापेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. त्यात पोलिसांसह नागरिकांचा समावेश आहे. दंगळीमुळे तेथे संचारबंदी लागू केली आहे. कायदा व सुव्यवस्था या भागात ढासळली असताना बघेल यांनी श्रेष्टींची कृपादृष्टी कायम रहावी, यासाठी उत्तर प्रदेश दौऱ्याचा घाट घातला आहे. यावरून ते टीकेचे धनी बनत आहेत.

अगोदरच त्यांचे वडील नंदकुमार बघेल यांनी ब्राह्मण द्वेषी वक्तव्य करून नुकतेच नव्या वादाला तोंड फोडले आहे. हे प्रकरण हाताळताना भूपेश बघेल यांची नाकीनऊ आले आहे. या प्रकरणात नंदकुमार बघेल यांना अटक सुद्धा झाली होती. त्यांच्या अटकेनंतर सुद्धा जनतेत त्यांच्याबद्दल प्रचंड नाराजी आहे.

आता भूपेश बघेल यांच्या उत्तर प्रदेश दौऱ्यामुळे नव्या वाद निर्माण झाला आहे. तसेच आपले मुख्यमंत्रीपद टिकवून ठेवण्यासाठी त्यांचा हा खटाटोप सुरु असल्याचा आरोप भाजपचे अमित मालवीय यांनी केला आहे. बघेल यांच्या दौऱ्यावर टीका करणारे ट्विट त्यांनी केले आहे.

Chief Minister Bhupesh Baghel leaves his own state in Uttar Pradesh; Riots, curfew in Chhattisgar

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात