मनी मॅटर्स : आपण जो खर्च करतोय त्याची गुंतवणुकीनंतर काय किमत होईल याचा नहमी विचार करा…


आपल्याकडे नसलेल्या पैश्यातून, आपल्याला नको असलेल्या लोकांना प्रभावित करण्यासाठी आपण नको असलेल्या गोष्टी घेतो, आणि अकारण नुकसान करून घेतो.Think about what you will get after investing what you are spending …

विख्यात गुंतवणूकतज्ञ विल स्मिथ यांचे हे गाजलेले वाक्य सदासर्वकाळ लागू पडते. हि गोष्ट आपल्याला जर थांबवायची असेल तर आपल्याला हाच विचार करावा लागेल कि आपण जो वायफळ खर्च करतोय त्याची गुंतवणुकीनंतर काय किमत होईल?

गुंतवणूकदारांमध्ये काय गुण हवे? गुंतवणूक करणे आपण कसे शिकू शकतो? आजच्या माहितीच्या जगात ह्या प्रश्न्याच उत्तर फार सोपे आहे. आज सर्व माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे, जास्त माहिती इंग्लिश मध्ये आहे. पण बरीच माहिती मराठी मध्येपण आहे. इंग्लिश येत नाही म्हणून कोणी आपल्याला श्रीमंत बनवणार आहे का? नवीन काय शिकण्याची तयारी असल्याशिवाय आपण श्रीमंत बनू शकत नाही.

शिवाय आपल्याकडे शब्दकोश, इंटरनेट आहे. त्यांचा वापर करून आपण बरेच काही शिकू शकतो इच्छा पाहिजे ती स्वताला बदलण्याची. असे लोक शोधा आजूबाजूला ज्यांना काही माहित आहे, हळू हळू ज्ञानात भर पडत जाईल. वेळ लागेल पण काम केले तर नक्कीच बदल घडून येईल. जेव्हा विद्यार्थी तयार होतो शिक्षक हाजीर होतो. गुंतवणूक आपण पैसा वाढवण्याकरिता करतो. विमा आपण काही वाईट झाल तर पैसे मिळावे याकरिता काढतो.

अनेक लोक विमा पॉलीसी काढून दोन्ही गोष्टी एकत्र करू पाहतात. पण त्यामुळे ना चांगला विमा मिळतो, ना गुंतवणूक होते. म्हणून समजून घ्या विमा हा गुंतवणूक नाही, विम्याचे काम वाईट वेळी आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत करणे आहे. विमा काढणे पण आवश्यक आहे, गरज आहे ती, विमा आणि गुंतवणूक योग्य प्रमाणात करण्याची. त्याकरिता त्यांना वेगळ करणे ठीक राहील.

दोन्ही गोष्टीमध्ये आपण पैसा लावतो, अधिक पैसा मिळवण्यासाठी. दोन्ही मध्ये पैसा गमावण्याचा धोका असतो, पण दोन्ही मध्ये फरक काय? जेव्हा कमी धोक्या मध्ये जास्त फायदा होत असेल, तेव्हा गुंतवणूक करावी पण जुगार याउलट असतो. जुगारात जास्तीत जास्त धोका घेतला तरच फायदा होतो. जुगारात फक्त नशिबच असते. गुंतवणूक डोक्याने केली जाते, गणित करून. तर जुगार भावनेने खेळला जातो.

Think about what you will get after investing what you are spending …

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण